गुलाबाच्या पाकळ्या त्वचेला मॉइश्चरायझ करतात. रोम छिद्रांमध्ये जमा झालेले तेल आणि दुर्गंधी दूर करतात. गुलाबामुळे त्वचा हायड्रेट राहते. गुलाबामधील अँटी बॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावरील जखम भरण्यास मदत करतात. गुलाब चेहऱ्याला अँटी-ऑक्सिडेंटचा पुरवठा करतो. यामुळे त्वचेच्या पेशी मजबूत होतात. तसेच रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे आपली त्वचा नैसर्गिक स्वरूपात दुरुस्त होते.
गुलाब पाकळ्यांचा फेस पॅक
तुम्हाला पावसाळ्यात त्वचेची छान काळजी घ्यायची असल्यास आठवड्यातून दोन वेळा गुलाब पाकळ्यांचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहरा तजेलदार आणि मऊ होईल. हा गुलाब पाकळ्यांचा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्या. एका भांड्यात गुलाब पाकळ्यांची पेस्ट, कोरफड, ग्लिसरीन टाका आणि छान मिक्स करून घ्या. ही क्रीम दीर्घकाळ टिकण्यासाठी हवाबंद डब्यामध्ये स्टोर करून फ्रिजमध्ये ठेवा. या क्रीमरने चेहऱ्याला मसाज केल्यास चेहरा चमकू लागतो. तसेच चेहऱ्याचे आरोग्य चांगले राहते. ही क्रीम तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लावून १० ते १५ मिनिटे मसाज करावा. यामुळे चेहरा छान होतो. क्रीम सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. थोडा वेळ चेहऱ्याला बर्फ चोळा.
चेहऱ्याचे आरोग्य उत्तम राहते
गुलाबामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म चेहऱ्याचे तारुण्य जपण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग दूर होतात. चेहऱ्यावरील कोलेजन वाढते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. तेलकट त्वचेची समस्या असलेल्या लोकांनी हा फेसपॅक किंवा क्रीमचा आवर्जून वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील चिकटपणा कमी होतो आणि त्वचेतील पाण्याची पातळी वाढते.
डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.