लाईफस्टाईल

Earwax: घरीच काही मिनिटांत काढता येईल कानातील घाण; कान साफ करण्याचे सर्वात सोपे-सुरक्षित उपाय पाहाच

How To Clean Ears At Home Safely: बरेच लोक कान स्वच्छ करण्यासाठी इअरबड्स किंवा इतर एखादी तीक्ष्ण वस्तू वापरतात. मात्र हे कानांसाठी हानिकारक ठरू शकतं. अशा परिस्थितीत कान कसे स्वच्छ करावे? हा प्रश्न सर्वांसमोर असतो.

Surabhi Jayashree Jagdish

शरीर स्वच्छ ठेवणं ही एक चांगली आणि आरोग्यदायी सवय आहे. आपल्या शरीराच्या इतर भागांप्रमाणे कानांची स्वच्छता देखील खूप महत्वाची आहे. कानात साचलेला इअरवॅक्समुळे केवळ श्रवण क्षमतेवरच परिणाम करत नाही तर संसर्ग देखील होऊ शकतो. बरेच लोक कान स्वच्छ करण्यासाठी इअरबड्स किंवा इतर एखादी तीक्ष्ण वस्तू वापरतात. मात्र हे कानांसाठी हानिकारक ठरू शकतं. अशा परिस्थितीत कान कसे स्वच्छ करावे? हा प्रश्न सर्वांसमोर असतो.

इअरवॅक्स काढून टाकण्यासाठी कोणते उपाय आहेत आणि कानातील मळ कसा काढायचा यासारखे प्रश्न अनेकदा विचारले जातात. इअरवॅक्स कसं काढायचं? जर तुम्हालाही तुमच्या कानात साचलेली घाण योग्य पद्धतीने मार्गाने काढायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला इअरवॅक्स स्वच्छ करण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि सोपी पद्धत सांगणार आहोत.

कानात मळ जमा होण्याची कारणं

  • धूळ आणि प्रदूषण

  • इअरबड्स किंवा हेडफोन्सचा जास्त वापर

  • कान स्वच्छ करण्याची चुकीची पद्धत

  • कोरडी किंवा तेलकट त्वचा

कानाची सफाई करण्यासाठी सोपा उपाय

कोमट तेलाने सफाई

कोमट तेल नैसर्गिकरित्या कानातील वॅक्स काढून टाकण्यास मदत करू शकतं. कानातील मेण काढून टाकण्यासाठी हा सर्वात जास्त वापरला जाणारा घरगुती उपाय मानला जातो.

कोमट नारळाचं तेल, ऑलिव्ह तेल किंवा बदाम तेल ड्रॉपर किंवा कापसाच्या मदतीने कानात २-३ थेंब टाका. तुमचं डोकं ५-१० मिनिटे एका बाजूला झुकलेले ठेवा. नंतर ते टिश्यूच्या मदतीने कान हळूवारपणे स्वच्छ करा.

गरम पाण्याची वाफ घेणं

पाण्याच्या वाफेमुळे कानातील वॅक्स मऊ होण्यास आणि ते सहज बाहेर येण्यास मदत होते. कानातील घाण काढून टाकण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असू शकतो.

एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि डोक्यावर टॉवेल ठेवून वाफ घ्या. १०-१५ मिनिटांनंतर, टिश्यू पेपरने कान हळूवारपणे पुसून टाका.

मीठ आणि कोमट पाणी

कान स्वच्छ करण्यासाठी मीठाचे पाणी ही एक नैसर्गिक पद्धत आहे. जी बरेच लोक अवलंबतात.

कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा.त्यात कापसाचा गोळा भिजवा आणि तो कानात ठेवा. काही वेळाने, तुमचे कान झुकवा आणि घाण बाहेर येऊ द्या.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT