Corn Rava Balls Recipe For Breakfast  Corn Rava Balls Recipe - Saam Tv
लाईफस्टाईल

Corn Rava Balls: नाश्त्याला शिरा- उपमा खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट कॉर्न रवा बॉल्सची रेसिपी करा ट्राय

Recipe For Breakfast: रोज सकाळी नाश्त्याला काय बनवाव हा पश्न सर्वांनाच पडलेला असतो. त्यामुळे स्वादिष्ट आणि झटपट होणारी कॉर्न रवा बॉल्सची रेसिपी नक्की ट्राय करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Corn Rava Balls Recipe:

रोज नाश्त्याला वेगळं काही बनवाव हा प्रश्न पडलेला असतो. रोज रोज पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा येतो. त्यात रोज वेगळं काय बनवाव असा प्रश्न प्रत्येक गृहीणीला पडलेला असतो. त्यात प्रत्येकाच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या असतात.

सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन स्वयंपाक बनवणे हे खूप जोखमीचे काम असतं. प्रत्येकाची आवड, चव ओळखून नाश्ता बनवावा लागतो. तसेच कधीतरी आपण इडली, डोसा बनवतो. परंतु हे पदार्थ बनवण्यासाठी खूप वेळ लागते. त्यामुळे झटपट आणि चविष्ट पदार्थ कोणता बनवावा असा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला झटपट आणि चविष्ट अशी कॉर्न रवा बॉल्सची रेसिपी सांगणार आहोत. कॉर्न रवा बॉल्स हे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतील. त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही.

सामग्री

  • २ कप रवा

  • पाणी

  • चिली फ्लेक्स

  • मिरची पावडर

  • हळद पावडर

  • उकडलेले कॉर्न

  • मोहरी

  • चिरलेल्या मिरच्या

  • आले

  • चवीनुसार मीठ

कृती

  • सर्वप्रथम कढईत रवा मंद आचेवर चांगला भाजून घ्या. रवा सतत हलवत राहा जेणेकरुन तो करपणार नाही.

  • यानंतर एका नॉन स्टिक पॅनमध्ये २ चमचे तूप गरम करुन त्यात मोहरी, कॉर्न, आले, चिली फ्लेक्स, हळद, मीठ आणि रवा घाला. त्यानंतर त्यात पाणी घालून शिजवून घ्या.

  • मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर मिश्रण थंड करुन घ्या. या मिश्रणाचे लहान गोळे करुन दहा मिनिटे मंद आचेवर वाफ घेऊन शिजवा. त्यानंतर वाफवलेले गोळे एका प्लेटमध्ये काढा. हे गोळे थंड करुन घ्या.

  • यानंतर एक कढईत २ चमचे तेल टाका. त्यात मोहरी, मीठ घालून वाफवलेले कॉर्न आणि रव्याचे बॉल्स टाका. हे कॉर्न रवा बॉल्स चांगले फ्राय करा.

  • त्यानंतर पुदीन्याची चटणी किंवा सॉससोबत तुम्ही हे बॉल्स खाऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemoglobin: हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या...

Mumbai News: गोरेगावमध्ये टेम्पोमध्ये मोठा स्फोट, एकाचा दुर्दैवी मृत्यू; नेमकं काय घडलं?

Jalgaon News: जळगावात पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल १५ लाखांची रोकड जप्त

Maharashtra News Live Updates: सोलापूरमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का

Viral Video: मस्ती नडली! स्केटिंग करत सायकलवर बसला, तरुणीने दाखवला इंगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT