कोमल दामुद्रे
जेवणाच्या ताटाची चव वाढते ती ताटच्या डाव्या बाजूला असणाऱ्या लोणच्याने.
अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची लोणची खायला आवडते. त्यासाठी ते अनेक प्रकारची लोणची घरात बनवतात.
जर तुम्हाला देखील झणझणीत आणि चटपटीत असे लाल मिरचीचे लोणच्याची चव चाखायची असेल तर रेसिपी पाहा.
15 मोठ्या लाल मिरच्या, २ चमचे मोहरी, 3 चमचे बडीशेप, 2 चमचे मेथी दाणे, 2 चमचे जिरे, 7-8 काळी मिरी, 1/4 टीस्पून हिंग, 1/2 टीस्पून हळद पावडर, 3 चमचे आंबा पावडर, चवीनुसार मीठ, 1 मोहरी तेल, 2 चमचे लिंबाचा रस
लाल मिरच्या धुवून वाळवा, देठ काढून बिया काढा.मिरचीच्या मध्यभागी सुरीने चीरा बनवा.
सर्व मसाले कोरडे भाजून थंड होऊ द्या. बारीक वाटून घ्या.
मीठ, मसाला पावडर, लिंबाचा रस आणि सुमारे 4 चमचे गरम आणि थंड मोहरीचे तेल घाला. चांगले मिसळा.
मिरच्या मसाला पावडरमध्ये भरा आणि काचेच्या बरणीत ठेवा. उरलेले मोहरीचे तेल घाला.
लोणचे पूर्णपणे तयार होण्यासाठी 5-6 दिवस कोवळ्या उन्हात ठेवा. नंतर सर्व्ह करा