Healthy Tasty Raggi Noodles :
हिवाळा म्हटलं की, या काळात थंडी अधिक प्रमाणात जाणवते. या काळात स्नायू अधिक बळकट होण्यासाठी आपण हेल्दी फूड खाण्याकडे अधिक भर दिला जातो.
हिवाळ्यात आपले आरोग्य निरोगी राहाण्यासाठी नाचणी खाण्याचा सल्ला दिला जातो. शरीरात अधिक उष्णता टिकवून ठेवण्यासाठी नाचणी खाल्ली जाते. परंतु, नाचणी खाताना मुलं नाक मुरडतात. अशावेळी मुलांना टेस्टी पण हेल्दी फूड खाऊ घालायचे असतील तर नाचणीच्या नुडल्सची रेसिपी ट्राय करु शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बाजारात नाचणीचे नुडल्स विकत मिळतात. त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत नाही. बनवताना त्याला योग्य प्रकारे उकळवल्यास अधिक चविष्ट लागतात.
2. कृती
नाचणीचे नूडल्स पाण्यात उकळवून घ्या. नंतर एका पॅनमध्ये मंद आचेवर तेल गरम करा.
त्यात चिरलेला लसूण, किसलेले आले आणि चिरलेली हिरवी मिरची घाला. लालसर होईपर्यंत चांगले परतवून घ्या.
नंतर त्यात भाज्या घालून थोडे शिजवून घ्या. त्यात पनीर किंवा टोफूचे तुकडे घालून २ ते ३ मिनिटे शिजवा.
वरुन चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. त्यात उकडवलेले नाचणीचे नूडल्स घालून चांगले मिसळा.
कोथिंबीर घालून वाफ काढा. सर्व्ह करा गरमागरम नाचणीचे टेस्टी हेल्दी नूडल्स मुलांना खाऊ घाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.