हिवाळा सुरु झाला की, बाजारात सर्वत्र पाहायला मिळतात ते पेरु. या फळाच्या सेवनाने आरोग्य चांगले राहाते. वजन कमी करण्यासाठी आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी पेरुचे सेवन केले जातात.
पेरु जितका स्वादिष्ट असतो तितकाच चविष्ट. यामध्ये जीवनसत्त्व ए, सी, फायबर आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात. याचे सेवन केल्याने पचन सुधारते, मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर तसेच रक्त वाढण्यासही मदत होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अनेकदा पेरुचे तुकडे मीठ लावून चवीने खाल्ले जातात. बरेचदा पेरु भाजूनही खाल्ला जातो. जर तुम्हालाही पेरुची चव चाखायची असेल तर त्याची चटणी ट्राय करु शकता. पाहूया रेसिपी
पेरुला कापून त्याचे तुकडे करुन घ्या. पेरुची चटणी बनवण्यासाठी पेरु, कोथिंबीर आणि हिरवी मिरची धुवून घ्या.
त्यात आले घाला. यात धणेपूड, जिरेपूड, मिरपूड, २ चिमूटभर हिंग, काळे मीठ, घालून वरुन लिंबू पिळा.
तयार मिश्रण मिक्समध्ये बारीक वाटून घ्या. पेस्ट घट्ट झाल्यास त्यात पाणी घालून पुन्हा वाटा.
चटणी वाटीत काढून सर्व्ह करा. तयार आहे आंबट-गोड पेरुची चटणी
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.