Matar Kachori Recipe: खुसखुशीत आणि झणझणीत मटार कचोरी बनवा; जाणून घ्या रेसिपी

Recipe From Matar: गरमागरम आणि खुसखुशीत कचोरी खायला सर्वांनाच आवडते. आपण वेगवेगळ्या मसाल्याची कचोरी खातो. त्यातील एक प्रकार म्हणजे मटार कचोरी. मटार कचोरी खायला अतिशय स्वादिष्ट लागते.
Matar Kachori Recipe in Marathi
Matar Kachori Recipe in MarathiMatar Kachori Recipe- Saam Tv
Published On

Matar Kachori Recipe Tips:

हिवाळा सुरु झाला आहे. हिवाळ्यात नेहमी काहीतरी नवीन चटपटीत पदार्थ खायला आवडतात. त्यात भजी, वडापाव असे पदार्थ आपण नेहमीच खातो. परंतु कधीतरी नवीन काहीतरी खायची इच्छा होते. कुरकुरीत पदार्थ खाण्याची मज्जा काहीतरी वेगळीच असते.

आपण अनेकदा काहीतरी वेगळं म्हणून कचोरी बनवतो. कचोरीमध्ये बटाट्याच कचोरी आणि वेगवेगळ्या मसाल्याची कचोरी. राज्यात वेगवेगळ्या पद्धतीच्या कचोरी प्रसिद्ध आहेत. त्यात शेगाव कचोरी खूप जास्त फेमस आहे. ही कचोरी एका विशिष्ट मसाल्यापासून बनवलेली असते. मात्र, तुम्ही कधी मटार कचोरी खाल्ली आहे का? मटार कचोरी खायला एकदम चविष्ट आणि कुरकुरीत लागते आणि ती बनवायलादेखील खूप सोपी आणि झटपट होते. आज आम्ही तुम्हाला मटार कचोरीची रेसिपी सांगणार आहोत.

Matar Kachori Recipe in Marathi
Healthy Pasta Recipe : हॉटेलसारखा बनवा एकदम परफेक्ट पास्ता, हेल्दीही आणि टेस्टीही; पाहा रेसिपी

साम्रगी

मटार

तेल

मसाले

बेसन

तूप

मैदा

Matar Kachori Recipe in Marathi
Flipkart TV Offers : 50 इंचाच्या Smart TV वर मिळत आहे 55 टक्के सूट, Sony आणि Samsung च्या टीव्हीवरही मोठी सवलत

कृती

सर्वप्रथम मटार पूर्णपणे वाफवून घ्या. त्यानंतर ते मॅश करा. मॅश केल्यानंतर त्यात थोड तेल टाकून घ्या.

त्यानंतर फोडणी देऊन मसाला टाकावा. मसाल्यातील पाणी गायब होईपर्यंत मटारचे सारण परतून घ्या. हे सारण तुम्ही कचोरीत भरु शकता.

मटार सारणात थोडे भाजलेले बेसन टाका. हे सारणातील पाणी पूर्णपणे शोषून घेतील.

कचोरीचे सारण मऊ बनवून घ्या. जाडसर सारण कचोरीतून बाहेर येण्याची शक्याता असते.

त्यानंतर मैदा चांगला मळून घ्यावा. पीठ मळताना त्यात थोडे तूप किंवा तेल टाकावे. पीठ मळून झाल्यावर १५ मिनिटे बाजूला ठेवा.

मटारचे गरम सारण कचोरीत भरु नका. संपूर्ण सारण थंड झाल्यवर ते कचोरीत भरा.

कचोरी कुरकुरीत होण्यासाठी तेलाचे तापमान तपासा. तेल खूप जास्त गरम झाल्यास कचोरीला कुरकुरीतपणा येत नाही. त्यामुळे कचोरी नेहमी मंद आचेवर तळून घ्या.

Matar Kachori Recipe in Marathi
High Uric Acid : युरिक अॅसिडची वाढलेली पातळी शरीरावर करते परिणाम, वेळीच घ्या काळजी, अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com