Flipkart TV Offers : 50 इंचाच्या Smart TV वर मिळत आहे 55 टक्के सूट, Sony आणि Samsung च्या टीव्हीवरही मोठी सवलत

Smart TV Offers : जर तुम्ही मोठा डिस्प्ले असलेला टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आहे. Flipkart च्या डीलमध्ये तुम्ही 55 टक्के सूट घेऊन 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.
Flipkart Offers On  Sony And Samsung  Smart TV
Flipkart Offers On Sony And Samsung Smart TVSaam Tv
Published On

Flipkart Offers On Sony And Samsung Smart TV :

जर तुम्ही मोठा डिस्प्ले असलेला टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आहे. Flipkart च्या डीलमध्ये तुम्ही 55 टक्के सूट घेऊन 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. या डीलमध्ये टीव्हीवर मोठ्या प्रमाणात बँक डिस्काउंटही देण्यात येत आहे.

याव्यतिरिक्त, तुम्ही आकर्षक एक्सचेंज डीलमध्ये नवीन 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही देखील खरेदी करू शकता. यामध्ये सोनी आणि सॅमसंग टीव्हीचाही समावेश आहे. हे टीव्ही दमदार साउंड आणि प्रीमियम लुकसह येतात. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Flipkart Offers On  Sony And Samsung  Smart TV
Pan Card Number Secret : पॅन कार्ड क्रमांकांमध्ये लपलेली असते तुमची 'ही' माहिती, हा एक क्रमांक आहे अतिशय खास

iFFALCON by TCL U62 50 inch Ultra HD (4K) LED Smart Google TV (iFF50U62)

या टीव्हीची किंमत 60,990 रुपये आहे. सेलमधील त्याची किंमत 55 टक्क्यांनी कमी होऊन 26,999 रुपये झाली आहे. बँक ऑफरद्वारे तुम्ही या टीव्हीची किंमत आणखी 10 टक्के कमी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये हा टीव्ही 2,000 रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या टीव्हीमध्ये तुम्हाला 60Hz च्या रिफ्रेश रेटसह अल्ट्रा HD 4K डिस्प्ले मिळेल आणि 24 वॅटचा साउंड आउटपुट मिळेल. (Latest Marathi News)

SAMSUNG Crystal 4K iSmart Series 50 inch Ultra HD (4K) LED Smart Tizen TV 2023 Edition (UA50CUE60AKLXL)

कंपनीच्या या टीव्हीची किंमत 61,900 रुपये आहे. यावर 30 टक्के सूट दिली जात आहे. बँक ऑफर्समध्ये टीव्ही 10 टक्क्यांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. हा टीव्ही तुम्ही 2,000 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटसह खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा टीव्ही 50Hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्लेसह येतो. पॉवरफुल साऊंडसाठी कंपनी या टीव्हीमध्ये 20-वॉट स्पीकर सेटअप देत आहे.

Flipkart Offers On  Sony And Samsung  Smart TV
Car Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार कारमध्ये या गोष्टी जरुर ठेवा, नकारात्मकता होईल दूर; घरात नांदेल सुख-समृद्धी

SONY X70L 50 inch Ultra HD (4K) LED Smart Google TV 2023 Edition (KD-50X70L)

या सोनी टीव्हीची किंमत 74,900 रुपये आहे. सेलमध्ये यावर 23 टक्के सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर याची किंमत 56,990 रुपये झाली आहे. या टीव्हीवर तुम्हाला 10 टक्के बँक डिस्काउंट देखील मिळेल. कंपनी या टीव्हीवर 2 हजार रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटही देत ​​आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या Sony TV मध्ये तुम्हाला 50Hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले मिळेल. साऊंडसाठी 20 वॅट स्पीकर सेटअप आहे.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com