Car Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार कारमध्ये या गोष्टी जरुर ठेवा, नकारात्मकता होईल दूर; घरात नांदेल सुख-समृद्धी

Vastu Tips For Car: वास्तुशास्त्रानुसार आपण घरात अशा अनेक गोष्टी असतात. ज्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे घरातील सुख-समृद्धी नाहीशी होते. तसेच नकारात्मकाता देखील वाढते.
Vastushastra Tips For Car in Marathi
Vastushastra Tips For Car in MarathiCar Vastu Tips - Saam Tv
Published On

Vastu Tips For Car :

वास्तुशास्त्रानुसार आपण घरात अशा अनेक गोष्टी असतात. ज्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे घरातील सुख-समृद्धी नाहीशी होते. तसेच नकारात्मकाता देखील वाढते.

घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घराव्यतिरिक्त वाहनांच्या वस्तूचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे सकारत्मकता वाढते. वाहनाच्या चुकीच्या वास्तूमुळे नकारात्मकतेचा सामना करावा लागतो. तसेच अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते. वाहनाच्या नकारात्मकतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी वास्तूचे नियम जाणून घ्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vastushastra Tips For Car in Marathi
Office Vastu Tips: ऑफिसच्या टेबलवर चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका, प्रमोशन होणं राहील दूर

1. देवाची मूर्ती

वास्तुनुसार सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी कारच्या (Car) डॅशबोर्डवर गणपतीची किंवा देवीची मूर्ती ठेवा. असे म्हटले जाते की, यामुळे वास्तूदोष दूर होतात. देवी-देवतांच्या कृपेने सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात.

Vastushastra Tips For Car in Marathi
Vastu Tips For Money Plant: घरात मनी प्लांट लावताना या चुका करु नका; पैशांची सतत भासेल कमतरता, करावा लागेल दारिद्रयाचा सामना

2. कासव

वास्तुनुसार (Vastu Tips) नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्ही कारमध्ये कासव ठेवू शकता. असे करणे अंत्यत शुभ मानले जाते.

3. पाण्याची बाटली

वास्तुशास्त्रानुसार कारमध्ये पाण्याची (Water) बाटली ठेवणे गरजेचे आहे. असे म्हटले जाते की, यामुळे मनात वाईट विचार येत नाही. तसेच व्यक्ती सर्तक राहातो. नकारात्मक ऊर्जा दूर होते.

Vastushastra Tips For Car in Marathi
Vastu Tips : घराच्या पश्चिम दिशेला चुकूनही ठेवू नका या गोष्टी, सतत सापडाल आर्थिक संकटात

4. मोरपंख

मोरपंख, शंकराचा डमरु आणि दुर्गा देवीची चुनरी कारमध्ये ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच जीवनातील अनेक अडचणी दूर होतात.

5. कारमध्ये या गोष्टी ठेवू नका

वास्तुनुसार तुटलेल्या वस्तू कधीही कारमध्ये ठेवू नका. तसेच कारच्या आरशांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. यामुळे नकारात्मकतेपासून दूर राहाल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com