अनेक सरकारी आणि महत्वाच्या कामासाठी पॅन कार्ड असणं खूप महत्वाचं आहे. ओळखपत्र म्हणूनही याचा प्रयोग केला जातो. यात Permanent संख्या असते. या नंबरमध्ये बरीच माहिती असते. या आकड्यांमध्ये दडलेला डेटा आयकर विभागासाठी खूप महत्त्वाचा आहे.
यामुळे आयकर विभागाकडून प्रत्येक व्यक्तीला पॅन कार्ड जारी केले जाते. मात्र पॅन कार्ड असणाऱ्यांकडे ही माहिती नसते. यातच पॅन कार्डमध्ये काय समाविष्ट आहे आणि त्याच्या Permanent अकाउंट नंबरचा अर्थ काय आहे? हेच आपण जाणून घेणार आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पॅन कार्डमधून व्यक्तीचे नाव आणि जन्मतारीख कळते. पॅन कार्ड नंबरमध्ये तुमचं आडनाव देखील असतं. पॅन कार्डचा पाचवा अंक धारकाचे आडनाव उघड करतो. तसेच प्राप्तिकर विभागाच्या नोंदींमध्ये कार्डधारकाचे फक्त उपनाव असतं. यामुळे, हा डेटा अकाउंट नंबरमध्ये देखील राहतो, परंतु प्राप्तिकर विभाग ही माहिती कार्डधारकांना देत नाही. (Latest Marathi News)
प्रत्येक 10 अंकी पॅन कार्डमध्ये संख्या आणि अक्षरे यांचे मिश्रण असते, ज्यामध्ये पहिले पाच वर्ण अक्षरे असतात, त्यानंतर चार वर्ण संख्या असतात आणि नंतर शेवटचे एक अक्षर असते. पॅन कार्डवर दर्शविलेल्या सर्व अंक आणि अक्षरांचे वेगवेगळे अर्थ आहेत.
आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, चौथ्या अक्षरात तुम्ही काय आहात हे दर्शविते. P म्हणजे वैयक्तिक, असा याचा अर्थ होतो. त्यापाठोपाठ C- कंपनी, H- Hindu Undivided, A- Union of people, B- Body of individual, T- ट्रस्ट, L– Local Authority , F- फर्म, G- सरकारी संस्था, J- Judicial असा याचा अर्थ असतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.