High Uric Acid : युरिक अॅसिडची वाढलेली पातळी शरीरावर करते परिणाम, वेळीच घ्या काळजी, अन्यथा...

Uric Acid Impact Body : एखाद्या व्यक्तीच्या रक्तामध्ये युरिक अॅसिड या सर्वसामान्य स्थितीमध्ये शरीरातील टाकाऊ पदार्थ असणाऱ्या घटकाची पातळी खूप वाढते तेव्हा त्याचा रुग्णाच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.
High Uric Acid
High Uric AcidSaam Tv
Published On

Hyperuricemia :

शरीरातील रक्तामध्ये युरिक अॅसिडची समस्या वाढल्यानंतर आरोग्यावर परिणाम होतो. या आजाराला सर्वत्र सर्रास आढळून येणाऱ्या आणि हायपरयुरिसेमिया या नावानेही ओळखले जाते.

परंतु, काही काळानंतर या आजाराची लक्षणे ही अधिक ठळकपणे जाणवतात. बरेचदा या समस्येचे पुरेसे निदान होत नाही, त्यामुळे या समस्येचा धोका वाढविणारी कारणे कोणती तसेच लवकरात लवकर स्क्रीनिंग तपासणी करून घेण्याची गरज या गोष्टींवर अधिक भर देणे आवश्यक आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अबॉट इन इंडियामध्ये असोसिएट मेडिकल डिरेक्टर असलेल्या डॉ. कार्तिक पीतांबरन यांच्या मते, युरिक अॅसिडच्या वाढलेल्या पातळीचा तुमच्या शरीरावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो हे खरे असले तरीही बहुतांश रुग्णांना याचे कोणतेही लक्षण (Symptoms) जाणवत नाही. यामुळे लोकांनी स्वत:हून हा धोका ओळखून स्वत:चे स्क्रिनिंग करून घेणे महत्त्वाचे ठरते.

असे केल्याने त्यांना ही समस्या वेळीच ओळखता येते व तिचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता येते तसेच संबंधित गुंतागूंतींचा धोकाही कमी करता येतो. स्क्रिनिंग व देखभालीच्या प्रक्रियेच्या सुलभीकरणास मदत करण्याचे आणि डॉक्टर्स (Doctors) व रुग्ण दोघांनाही मदत पुरविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे लोकांना आपल्या शरीरातील युरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती योग्य माहिती मिळून ते सुसज्ज राहतील.

High Uric Acid
Health Benefits: हिवाळ्यात चमचाभर मध खा, आरोग्याला होतील अनेक फायदे

बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. दिलीप कृपलानी म्हणाले, अभ्यासानुसार मधुमेह, उच्च रक्तदाब (Blood Pressure) किंवा दोन्ही आजार असलेल्या रुग्णांपैकी ३० टक्‍के रुग्णांना हायपरयुरिसेमियाचा त्रास असतो. युरिक अॅसिडची पातळी भरपूर वाढलेली असणे हे किडनीचे दुर्धर आजार आणि किडनीला तीव्र दुखापत होण्यास कारणीभूत ठरणारा धोकादायक घटक ठरू शकतो. तरीही लक्षणविरहित प्रकरणांमध्ये या स्थितीचे निदान होत नाही.

सुरुवातीच्या टप्प्यावर स्क्रिनिंग करून घेणे आणि वाढलेल्या युरिक अॅसिडचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे हे व्यक्तीचे एकूण स्वास्थ्य जपण्याच्या आणि त्याच्याशी निगडित समस्यांच्या प्रतिबंध वा व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

शरीराने तयार केलेल्या एकूण युरिक अॅसिडपैकी ६० टक्‍के ते ६५ टक्‍के किडन्यांद्वारे रक्तप्रवाहातून बाहेर काढले जाते, जे लघवीवाटे शरीरातून बाहेर टाकले जाते. उर्वरित आम्ल पोटाच्या वाटेने (आतडी आणि पित्तामधून काढून टाकले जाते. जेव्हा हे युरिक अॅसिड खूप जास्त प्रमाणात तयार होते आणि शरीरातून योग्य प्रकारे उत्सर्जित होत नाही त्यावेळी समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे त्याचे खडे तयार होऊ शकतात, जे व्यक्तीच्या सांध्यांमध्ये किंवा किडन्यांमध्ये जमा होऊन त्यातून गाऊट (संधीवाताचा एक वेदनादायी प्रकार), मुतखडे म्हणजे किडनी स्टोन्स किंवा इतर गुंतागुंती उद्भवू शकतात.

High Uric Acid
Almond Oil For Hair : केसांची वाढ खुंटलीये? घनदाट केसांसाठी बदामाच्या तेलाचा असा करा वापर, महिनाभरात फरक दिसेल

ही समस्या किती सामान्य आहे? अभ्यासातून असे दिसून येते की, हायपरयुरिसेमियाची समस्या भारतात (India) हळूहळू वाढत आहे. विविध भारतीय राज्यांमध्ये या समस्येच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वेगवेगळे आहे जे काही प्रांतांमध्ये ४७.२ टक्‍के इतके अधिक आहे. युरिक अॅसिडची पातळी वाढण्यासी समस्या पुरुष आणि वयोवृद्ध माणसे अशा काही विशिष्ट लोकसंख्यागटात अधिक सर्रासपणे आढळून येते.

किडनी, उदरात किंवा अंतस्त्रावी ग्रंथींशी संबंधित काही विशिष्ट आजारांमुळे रक्तामध्ये युरिक अॅसिडचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे शरीराच्या युरिक अॅसिड बाहेर टाकण्याच्या नियमित प्रक्रियेत अडथळा निर्माण होते.

High Uric Acid
Dry Eye Syndrome : प्रदूषणामुळे डोळे पडताय कोरडे? ही लक्षणे दिसल्यास वेळीच घ्या काळजी

एखादी व्यक्ती जेव्हा चरबीयुक्त मांस, अल्कोहोल, सुकविलेल्या शेंगा किंवा वाटाणे, किंवा प्रामुख्याने सफरचंद, कलिंगड यांसारख्या फळांमध्ये नैसर्गिकरित्या सापडणारी साखर भरपूर प्रमाणात असलेल्या फ्रुक्टोसने समृद्ध खाद्यपदार्थांचे अतिरेकी सेवन करते तेव्हाही युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते.

1. हायपरयुरिसेमिया ओळखण्याचा मार्ग

युरिक अॅसिडचे प्रमाण खूप जास्त असलेल्यांपैकी काही व्यक्तींना तीव्र सांधेदुखी सुरू होते, त्वचा हळवी, लालसर दिसते किंवा सुजते. जेव्हा युरिक अॅसिडची पातळी वाढल्याने किडनी स्टोन्स होतात तेव्हा पाठीच्या खालच्या भागात वेदना येणे, मळमळणे आणि लघवीस जाताना त्रास किंवा वेदना होणे अशी चिन्हे दिसून येऊ शकतात.

High Uric Acid
Burnout Syndrome : नोकरी करणाऱ्यांमध्ये 'बर्नआउट सिंड्रोमचा' धोका अधिक, लक्षणे काय? जाणून घ्या सविस्तर

मात्र हायपरयुरिसेमिया असलेल्या जवळ-जवळ ६० टक्‍के लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. परिणामी अनेकांच्या बाबतीत या समस्येचे निदानच होत नाही. तरीही लक्षणविरहित हायपरयुरिरेमियाची समस्या कार्डिओव्हॅस्क्युलर आजार, लठ्ठपणा, मधुमेह आणि अशी अनेक आजारांसाठी धोकादायक बाब आहे.

तुम्ही पुरुषगटातील असाल, वयोवृद्ध असाल, लठ्ठपणासह जगत असाल किंवा तुमचा बॉडी मास इंडेक्स खूप जास्त असेल, वा तुमच्या आहारात रेड मीट, समुद्री जीव, अल्कोहोल किंवा फ्रुक्टोस यांचे प्रमाण खूप जास्त असेल तर तुम्हाला या आजाराचा असलेला धोका वाढतो. उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार आणि हायपोलिपिडेमिया आणि हायपोथायरॉइडिझम असलेल्या व्यक्तींनाही या समस्येचा धोका अधिक असतो.

High Uric Acid
Drinking Water : हिवाळ्यात दिवसाला किती ग्लास पाणी प्यायला हवे? कमी पाणी प्यायल्याने गंभीर आजार जडू शकतो?

खरेतर काही मान्यवर वैद्यकीय संस्थांनी कार्डिओव्हॅस्क्युलर आजार, मधुमेह, मेटॅबोलिक सिंड्रोम आणि किडनी स्टोन्सच्या रुग्णांना हायपरयुरीसेमियाच्या स्क्रिनिंगचा सल्ला दिला आहे. यासाठी जोखीम मूल्यमापनाच्या मोजपट्टीसारखी साधीसोपी साधने उपलब्ध आहेत, ज्यांच्याद्वारे तुम्ही युरिक अॅसिडच्या वाढलेल्या पातळीच्या संभाव्य धोक्यांचा हिशेब करू शकता.

2. वेळीच निदान करून संबंधित गुंतागूंती टाळता येतील.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की युरिकअॅसिडचे प्रमाण खूप जास्त असलेल्या व्यक्तींना कार्डिओव्हॅस्क्युलर आजारा जडण्याचा धोका तुलनेने अधिक असतो. उच्चरक्तदाब, तीव्र इस्चेमिक स्ट्रोक किंवा कोरोनरी आर्टरीजा आजार असलेल्या लोकांमध्ये हायपरयुरिसेमियाचे प्रमाण खूप जास्त असल्याचे आढळते. , , संशोधनातून असेही सूचित झाले आहे की, युरिक अॅसिडच्या वाढलेल्या पातळीमुळे इन्सुलिनला प्रतिरोध निर्माण होतो, ज्यामुळे टाइप २ डायबेटिस विकसित होऊ शकतो.

High Uric Acid
Parenting Tips : वाढत्या वयात मुलांची बुद्धी कशी कराल तल्लख? या टीप्स फॉलो करा

शिवाय जीवनशैलीमध्ये काही विशिष्ट बदल केल्यास हायपरयुरिसेमिया आण संबंधित गुंतागूंतींना प्रतिबंध करता येऊ शकतो. यात दैनंदिन व्यायाम आणि आपले वजन नियंत्रणात ठेवणे, रेड मीट, मासे आणि अल्कोहोलसेवनाचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे, कमी स्निग्धांश असलेले दुग्धजन्य पदार्थ खाणे, क जीवनसत्वाने समृद्ध पदार्थांचे पुरेशा प्रमाणात सेवन करणे आणि आहारात भाज्यांपासून मिळणारी प्रथिनं, सुकामेवा आणि शेंगा अधिक प्रमाणात खाणे, हाय फ्रुक्टोस कॉर्न सिरप (साखरेचा एक प्रकार) वापरलेले पदार्थ टाळणे, साखरेच्या पेयांचे प्रमाण कमी करणे या उपाययोजनांचा त्यात समावेश होतो.

आपल्याला हायपरयुरिसेमियाचा धोका खूप जास्त आहे अशी तुम्हाला शंका असल्यास किंवा काही चिंताजनक लक्षणे अनुभवास आल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. यामुळे अशा व्यक्तींना आपल्या शरीरातील युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी एक ठोस कृतीयोजना आखता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com