Drinking Water : हिवाळ्यात दिवसाला किती ग्लास पाणी प्यायला हवे? कमी पाणी प्यायल्याने गंभीर आजार जडू शकतो?

Winter Dehydration Problem : वातवारणातील बदलामुळे आपल्याला तहान कमी लागते. उन्हाळ्यात आपण जितक्या प्रमाणात पाणी पितो त्यापेक्षा कमी प्रमाणात पाणी हिवाळ्यात पितो.
Drinking Water
Drinking WaterSaam Tv
Published On

How Much Water Drink in Winter Season :

हिवाळा म्हटले की, वातावरणात अनेक बदल होत असतात. ऋतूमानानुसार बदल झाल्यामुळे आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. या ऋतूमध्ये आपण कमी प्रमाणात पाणी पितो. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे अनेक आजार उद्भवतात.

वातवारणातील बदलामुळे आपल्याला तहान कमी लागते. उन्हाळ्यात आपण जितक्या प्रमाणात पाणी पितो त्यापेक्षा कमी प्रमाणात पाणी हिवाळ्यात पितो. आपले शरीर ७० टक्के पाण्यानी भरलेले आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याचा स्तर नियंत्रणात ठेवण्यासाठी दिवसाला किमान तीन ते चार लिटर द्रव पदार्थासोबत पाणी प्यावं. परंतु, हिवाळ्यात किती ग्लास पाणी आपण दिवसाला प्यायला हवं. कमी पाणी प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया सविस्तर  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तहान लागणे ही आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असते. जर उष्ण ठिकाणी असल्यास पाण्याची (Water) गरज अधिक भासते. पण थंड भागात असल्यास पाण्याची कमतरता अधिक जाणवते. बदलेल्या जीवनशैलीनुसार आपण कामाच्या ठिकाणी सतत एसीमध्ये असतो त्यामुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या जाणवते.

Drinking Water
Red Mirchi Pickle Recipe : चटपटीत अन् तिखट बनारसी लाल मिरचीचं लोणचं कसं बनवाल? पाहा रेसिपी

कामाच्या प्रकाराचा आपल्याला आरोग्यावर (Health) होतो. शारीरिक काम अधिक प्रमाणात करत असाल तर तहान अधिक लागते. बैठे काम करत असाल तर तहान कमी लागते. लहान मुलांना सतत पाणी पिण्याची सवय असते. ते इकडून-तिकडून उड्या मारत असतात. त्यांच्या शारीरिक हालचालीत बदल होतात.

खरेतर कोणत्याही ऋतूमध्ये ८ ते १० ग्लास पाणी पिणे शरीरासाठी गरजेचे असते. तहान कमी लागत असली तरी शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता असते. जर शरीरात पाण्याची कमरता जाणवल्यास डिहायड्रेशन, त्वचेची (Skin) समस्या, श्वासोच्छवास सारख्या समस्या उद्भवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com