Panner Pasanda Recipe : भाऊबीजेच्या स्पेशल थाळीमध्ये ट्राय करा पनीर पसंदा, पाहुण्यांना नक्की आवडेल; पाहा रेसिपी

How To Make Paneer Pasanda: तिच तिच भाजी खाऊन तुम्हालाही वैताग आला असेल तर भाऊबीजला ट्राय करा पनीर पसंदा.
Panner Pasanda Recipe in Marathi:
Panner Pasanda Recipe in Marathi:Panner Pasanda Recipe in Marathi-Saam Tv
Published On

How To Make Paneer Pasanda:

पनीर म्हटले की, शाकाहरी प्रेमींच्या तोंडाला पाणीच सुटते. व्हेज थाळीमध्ये सगळ्याचा आवडता पदार्थ पनीर. दिवाळीच्या काळात आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्या घरी अनेक पाहुणे येतात.

या दिवशी आपण जेवणाच्या थाळीमध्ये काहीतरी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करतो. परंतु, पालक पनीर, पनीर भुर्जी, पनीर मसाला तिच तिच भाजी खाऊन तुम्हालाही वैताग आला असेल तर भाऊबीजला ट्राय करा पनीर पसंदा. घरच्या घरी कशी बनवायची पाहूया रेसिपी.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Panner Pasanda Recipe in Marathi:
Kaju Paneer Recipe: घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट काजू पनीर; पाहा रेसिपी

1. साहित्य | Ingredients

पनीर साठी

  • पनीर २०० ग्राम | Paneer 200 Gram

  • किसलेले पनीर १०० ग्राम | Grated Paneer 100 Gram

  • बदाम ४ ते ५ | Almonds 4 to 5

  • काजू ४ ते ५ | Cashew Nuts 4 to 5

  • बेदाणे ४ ते ५ | Bedane 4 to 5

  • पिस्ते २ ते ३ | Pistachios 2 to 3

  • बारीक चिरलेला पुदिना | Finely Chopped Mint Leaves

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची | Finely Chopped Green Chilly

  • बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely Chopped Coriander

  • बारीक चिरलेले आले १ इंच | Finely Chopped Ginger 1 inch

  • गरम मसाला १/४ छोटा चमचा | Garam Masala ¼ tsp

  • मीठ | Salt

  • पिठी साखर १/४ छोटा चमचा | Sugar Powder ¼ tsp

  • कॉर्नफ्लोअर ३ ते ४ मोठे चमचे | Corn Flour 3 to 4 tbsp

  • हळद १/४ छोटा चमचा | Turmeric Powder ¼ tsp

Panner Pasanda Recipe in Marathi:
Makyacha Chivda Recipe : दिवाळीत बनवा खमंग, कुरकुरीत मक्याचा चिवडा; चटपटीत चिवड्याची रेसिपी पाहा

2. ग्रेव्हीसाठी | For Gravy

  • काजू १० ते १२ | Cashew Nuts 10 to 12

  • कांदे ४ मध्यम | Onion 4 Medium Size

  • उभी चिरून हिरवी मिरची २ | Green Chilly with Straight Cut 2

  • तेल २ मोठे चमचे | Oil 2 tbsp

  • तमाल पत्र १ | Bay Leaf 1

  • मसाला वेलची १ | Masala Cardamom 1

  • हिरवी वेलची २ | Green Cardamom 2

  • टोमॅटो १ मोठा | Tomato 1 tbsp

  • मीठ १/२ छोटा चमचा | Salt ½ tsp

  • पाणी १.५ कप | Water 1.5 cup

3. मसाला पेस्ट साठी | For Masala Paste

  • आले लसूण पेस्ट १ छोटा चमचा | Ginger Garlic Paste 1 tsp

  • हळद १/२ छोटा चमचा | Turmeric Powder ½ tsp

  • बेडगी मिरची पावडर १ छोटा चमचा | Bedagi Chilly Powder 1 tsp

  • धने पूड १ छोटा चमचा | Coriander Powder 1 tsp

  • जिरे पूड १ छोटा चमचा | Cumin Powder 1 tsp

Panner Pasanda Recipe in Marathi:
Poha Pakoda Recipe: सतत नाश्त्याला कांदे पोहे खाऊन आलाय वैताग? ट्राय करा झटकेपट बनणारे चविष्ट पकोडे, रेसिपी बघा

4. तडक्यासाठी | For Tadaka

  • तेल २ मोठे चमचे | Oil 2 tbsp

  • बटर २ मोठे चमचे | Butter 2 tbsp

  • तमाल पत्र १ | Bay Leaf 1

5. तयार मसाला पेस्ट | Ready Masala Paste

  • तयार ग्रेव्ही | Ready Gravy

  • मीठ | Salt

  • गरम मसाला पावडर १ छोटा चमचा | Garam Masala Powder 1 tsp

  • फ्रेश क्रीम १/४ कप | Fresh Cream ¼ cup

6. कृती

  • सर्वप्रथम कढई घेऊन त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात तमालपत्र, मोठी वेलची, मिरची घाला.

  • नंतर त्यात कांदा घालून परतवून घ्या. कांदे लालसर झाल्यानंतर त्यात टोमॅटो, भिजवलेले काजू आणि मीठ घालून परतवून घ्या.

  • त्यानंतर त्याला उकळी येईपर्यंत झाकूण ठेवा. गॅस बंद करुन त्यातीस तमालपत्र आणि वेलची काढून घ्या.

  • पनीरचे मोठ्या आकारात एकसारखे तुकडे करुन घ्या. त्यातील थोड्या पनीरला किसून घ्या.

  • किसलेल्या पनीरमध्ये बदामाचे काप, बेदाण्याचे काप, काजूचे काप, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेल आले, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने, गरम मसाला आणि चवीपुरता मीठ, १ चमचा पिठीसाखर घालून चांगले मिक्स करा.

  • तयार मिश्रण पनीरवर स्टफ करुन घ्या. नंतर स्लाइसला बंद करा. कॉनफ्लावर घेऊन त्यात हळद घालून पेस्ट तयार करा.

Panner Pasanda Recipe in Marathi:
Motichoor Ladoo Recipe : घरच्या घरी बनवा मोतीचूरचा लाडू, यंदाचा दिवाळीला ट्राय करा; पाहा रेसिपी
  • पेस्टमध्ये तयार पनीर स्टफ घोळवून घ्या. नंतर कॉनफ्लॉवरने पनीरच्या साइडच्या कडा बंद करा. तयार स्टफिंग तेलात तळून घ्या.

  • नंतर तेलात तळलेला मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर वाटीमध्ये आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, धणे पावडर, हळद पावडर मिक्स करा. त्यात थोडेसे पाणी घालून चांगले एकजीव करा.

  • नंतर कढईत तेल आणि बटर घाला. त्यात मसाल्यांची पेस्ट, तयार ग्रेव्ही घालून चांगली परतून घ्या. नंतर त्यात थोडे पाणी घाला.

  • त्यात चवीपुरता मीठ आणि गरम मसाला घाला. चांगले मिसळून घ्या, वरुन फ्रेश क्रीम घाला. नंतर तयार पनीरचे दोन भाग करा.

  • सर्व्हिंग प्लेटमध्ये पनीर ठेवून वरुन तयार ग्रेव्ही घाला. सर्व्ह करा पनीर पसंदा.

Panner Pasanda Recipe in Marathi:
Peru Chi Chutney Recipe: घरच्या घरी ट्राय करा पेरुची आंबट-गोड चटणी, पाहा रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com