Motichoor Ladoo Recipe
Motichoor Ladoo RecipeSaam Tv

Motichoor Ladoo Recipe : घरच्या घरी बनवा मोतीचूरचा लाडू, यंदाचा दिवाळीला ट्राय करा; पाहा रेसिपी

How To Make Perfect Motichoor Ladoo : तुम्ही देखील घरच्या घरी मोतीचूरचा लाडू ट्राय करणार असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.
Published on

Diwali Special 2023 :

दिवाळीला सुरूवात झाली आहे. घराघरात फराळ बनवून झाला आहे. घरात पाहुणे यायला सुरूवात असून कंदील, दिव्यांनी घर सजले आहे. घरात पाहुणे येणार म्हटल्यावर मिठाई आणली जाते.

दिवाळीत (Diwali) मिठाईच्या दुकानात अधिकतर पाहायला मिळतो तो मोतीचूरचा लाडू. अगदी कमी पैशांत मिळणारी मिठाई म्हटंल तर वावग ठरणार नाही. जर तुम्ही देखील घरच्या घरी मोतीचूरचा लाडू ट्राय करणार असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य

  • १ किलो बेसन बुंदी

  • साखर (Sugar)

  • तूप

  • वेलची पावडर

  • काजूचे तुकडे

  • मगज बी

  • मीठ आवश्यकतेनुसार

Motichoor Ladoo Recipe
Shahi Kadhai Panner Recipe : घरच्या घरी ट्राय करा शाही कढई पनीर रेसिपी, पुलाव-नानसोबत चवीचवीने खाल; पाहा रेसिपी

2. कृती

  • सर्वप्रथम बुंदी बनवण्यासाठी बेसन पीठ भिजवून घ्यावे. त्यात आवश्यकतेनुसार मीठ टाका. त्यानंतर ती बुंदी बारीक झाऱ्याने पाडून घ्यावी.

  • बुंदी बनवण्यासाठी सर्वात आधी पाक तयार करावा लागतो. त्यासाठी एक किलो साखर घ्यावी. साखर विरघळेल एवढ्या पाण्यात मध्यम आचेवर उकळून घ्यावे.

Motichoor Ladoo Recipe
Rava Ladoo Recipe : रव्याचा लाडू वळवताना फुटतो, प्रमाणही चुकते; परफेक्ट कृती पाहाच, झटपट बनतील
  • साखर विरघळेपर्यंत साखरेचा पाक सतत हलवत राहावा. पाक एकतारी व्हावा यासाठी सतत हलवत राहावे. त्यानंतर गॅस (Gas) बंद करावा. त्यात वेलची पावडर घालावी. त्याचसोबत केशर घालावे.

  • पाक थंड झाला की त्यात तयार झालेली बुंदी घालावी आणि हलवून घ्यावी. वर खाली बुंदी हलव्यास ती छान मुरते. त्यानंतर बुंदी अर्धा तास झाकून ठेवावी. त्यानंतर लाडू वळण्यास सुरूवात करावे.

  • लाडू वळताना त्याला मगज बी आणि काजू लावावेत. त्यानंतर सजावटीसाठी चांदीचा वर्ख लावला तरी चालेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com