Shahi Kadhai Panner Recipe : घरच्या घरी ट्राय करा शाही कढई पनीर रेसिपी, पुलाव-नानसोबत चवीचवीने खाल; पाहा रेसिपी

How To Make Hotel Style Shahi Kadhai Paneer : तुम्ही डिनर किंवा लंचसाठी स्पेशल रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर शाही कढाई पनीर रेसिपी ट्राय करु शकता.
Shahi Kadhai Panner Recipe
Shahi Kadhai Panner RecipeSaam Tv
Published On

Diwali Special Recipe 2023 :

दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा सण. या काळात आपण अनेक गोडाधोडाचे पदार्थ बनवतो. मिठाईसोबत फराळाचा देखील आस्वाद घेतला जातो. दिवाळीच्या सणात आनंद द्विगुणित करण्यासाठी आपल्या घरी अनेक पाहुणे येतात.

या दिवशी आपण काहीतरी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करत असता. तुम्ही डिनर किंवा लंचसाठी स्पेशल रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करत असाल तर शाही कढाई पनीर रेसिपी ट्राय करु शकता. घरच्या घरी हॉटेलसारखी शाही कढई पनीर रेसिपी कशी बनवायची हे पाहूया  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य

  • 250 ग्रॅम पनीर

  • 2 चमचे धणे

  • 10 सुक्या लाल मिरच्या

  • 2 टेबलस्पून तेल (Oil)

  • एक टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण (Garlic)

  • एक टेबलस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • एक कप टोमॅटो प्युरी

  • 1 टीस्पून कसुरी मेथी

  • चवीनुसार मीठ

  • हळद पावडर

  • मिरची पावडर

  • गरम मसाला

  • चिमूटभर साखर (Sugar)

  • ½ कप फ्रेश क्रीम

  • तेल २ चमचे

  • बारीक चिरलेला कांदा

  • धणे जिरे पावडर

Shahi Kadhai Panner Recipe
Rava Ladoo Recipe : रव्याचा लाडू वळवताना फुटतो, प्रमाणही चुकते; परफेक्ट कृती पाहाच, झटपट बनतील

2. कृती

  • सर्वप्रथम कढईत थोडे तेल गरम करा. त्यात पनीरचे तुकडे हलके तळून घ्या. पनीरमधील तेल नितरण्यास ठेवा.

  • नंतर त्याच कढईत कांदा घालून फ्राय करुन घ्या. कांदा शिजल्यानंतर त्यात टोमॅटोची प्युरी घाला.

  • त्यात धणे, जिरेपूड, मिरची पावडर, हळद गरम मसाला आणि कसुरी मेथी टाका आणि मध्यम आचेवर आणखी २ मिनिटे परतून घ्या.

  • मसाला शिजल्यावर त्यात शिमला मिरची घाला. आता थोडा वेळ व्यवस्थित शिजवून घ्या. काही वेळाने चवीनुसार मीठ घालून सतत ढवळत राहा.

Shahi Kadhai Panner Recipe
Besan Ladoo Recipe : गोल दाणेदार बेसनाचा लाडू, तोंडात टाकताच विरघळेल; रेसिपी पाहा परफेक्ट बनेल
  • नंतर त्यात वरुन पनीर घालून दोन मिनिटे शिजवून घ्या. फ्रेश क्रीम घालून मिक्स करा.

  • वरुन कोथिंबीरने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा शाही कढई पनीर.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com