Diwali 2024 Travel yandex
लाईफस्टाईल

Diwali 2024 Travel: दिवाळी सुट्टीत मुलांसाठी ४ भन्नाट पार्क, फक्त एका दिवसात पाहता येतील 'ही' ठिकाणे

diwali travel: दिवाळीत तुमच्या जवळच्या शहरातल्या काही प्रसिद्ध उद्यांनाना तुम्ही भेट देवू शकता.

Saam Tv

दिवाळीची सुट्टी लहान मुलांसाठी खूप स्पेशल असते. लहान मुलांना अभ्यासा व्यतीरिक्त गोष्टी शिकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी ही सुट्टी तुम्ही घालवू शकता. लहान मुलांना एकदा शाळा सुरु झाली की, उन्हाळ्याचीच मोठी सुट्टी मिळते.

त्यावेळ आपण इतर ठिकाणी न जाता फक्त गावी जाण्याचा प्लॅन करतो. मग आपली मुलं कंटाळतात. याचाच विचार करुन आम्ही तुमच्यासाठी पुण्यातील काही प्रसिद्ध आणि लहान मुलांना आवडतील अशी ठिकाणांची माहिती देणार अगदी एका दिवसात तुम्ही या ठिकाणांना भेट देवू शकता. चला तर पाहूया ठिकाणं.

Adlabs Imahica

लहान मुलांसाठी पिकनिक प्लॅन करायचा विचार करत असाल तर Adlabs Imahica किंवा थीम पार्क हे ठिकाण सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही हवा तितका वेळ इथे घालवू शकता. यात थीम पार्क, स्नो पार्क, वॉटर पार्क, गेमिंग पार्क आणि उत्तम जेवणाचे हॉटेल अशी ठिकाणे तुम्ही एकत्र पाहू शकता. याची वेळ सकाळी १०.३० ते रात्री ८ अशी आहे. याचे प्रवेश शुल्क ५९९ आहे.

गो क्रेझी ऍडव्हेंचर

लहान मुलांना साहसी खेळ खेळण्याची आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही गो क्रेझी ऍडव्हेंचर पार्कला भेट देवू शकता. हे पुण्यातले लहान मुलांसाठीचे प्रसिद्ध पार्क आहे. लहान मुलांच्या शरीराच्या विकासासाठी लाभदायक असणारे हे ठिकाण आहे.

इथे तुम्हाला रायफल शुटींग, भिंतीवर चढणे, बाईक रायडिंग, बंजी ट्रॅम्पोलिन यांसारखे विविध खेळ खेळता येतील. याची वेळ सकाळी ९ ते सांयकाळी ५ पर्यंत आहे. याचे प्रवेश शुल्क ४५० पासून आहे.

राजीव गांधी प्राणी संग्रहालय

पुण्याच्या आयटी पार्क, मोठ्या इमारतींच्या जंगलात एक कोपरा असा आहे जिथे वाघ, सिंह, हत्ती असे प्राणी निंवात फिरतीवर असतात. लहान मुलांना निसर्गाबद्दल प्रेम वाढवण्यासाठी हे उत्तम स्थळ आहे. तसेच लहान मुलांना प्राणी हा विषयचं फार जवळता असतो.

त्यामुळे राजीव गांधी प्राणी संग्रहालयात सुट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुले येत असतात. याचे प्रवेश शुल्क अगदी खिशाला परवडणारे आहे. लहान मुलांचे ५ रुपये तर मोठ्यांचे १५ रुपये आहे. याची वेळ सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5 (गुरुवार ते मंगळवार) आहे.

पुण्यातील प्रसिद्ध जपानी गार्डन

भारत आणि जपान यांच्यातील मैत्रिचे प्रतिक म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध जपानी गार्डन हे ठिकाण आहे. बरिच लहान मुले कार्टुन पाहतात. त्याच्यातील दृश्य बऱ्याच वेळेस जपानची असतात. आता इतक्या लांब जाणे बऱ्याच जणांना परवडणारे नसते.

त्यामुळे तुम्ही पुण्यातील जपानी पार्कला भेट देवू शकता. याची वेळ संध्याकाळी ४ ते ७ अशी आहे. तिथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता, फुटबॉल खेळू शकता, तसेच तलावाजवळ बसून तुमचा वेळ घालवू शकता.

Written By: Sakshi Jadhav

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT