Shreya Maskar
गूळ आणि फुटाण्याचे लाडू बनवण्यासाठी भाजलेले फुटाणे, गूळ, तूप, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट इत्यादी साहित्य लागते.
गूळ आणि फुटाण्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम फुटाणे सोलून मिक्सरला जाडसर वाटून घ्या.
आता एका पॅनमध्ये तूप टाकून छान गरम करा.
गरम तूपात किसलेला गूळ घालून मंद आचेवर वितळू द्या.
गूळाच्या सारणात आता फुटाण्याची भरड घालून चांगले मिक्स करून घ्या.
या मिश्रणात वेलची पूड आणि कापलेले ड्रायफ्रूट घाला.
मिश्रण आता घट्ट करून त्याचे लाडू वळून घ्या.
लाडूवर सजावटीसाठी तुम्ही ड्रायफ्रूट लावा.