Shreya Maskar
पालक चिप्स बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मैदा, पालक, तेल आणि गरजेनुसार पाणी इत्यादी साहित्य लागते.
हळद, ओवा, जिरे, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ इत्यादी मसाले लागतात.
पालक चिप्स बनवण्यासाठी सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून वाटून घ्या.
एका बाऊलमध्ये पालक प्युरी टाकून त्यात ओवा, जिरे, तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा.
दुसरीकडे एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ टाका आणि पालक प्युरीचे सारण त्यात ओता.
आता पाण्याच्या साहाय्याने पीठ छान मळून घ्या.
तयार झालेल्या पीठाचे गोळे करून चपातीप्रमाणे लाटून घ्या.
शंकरपाळी सारखे छोटे तुकडे करून तेलात मंद आचेवर पालक चिप्स तळून घ्या.
NEXT : कोकणात दिवाळीला बनवतात 'हा' खास पारंपरिक पदार्थ, तोंडात टाकताच विरघळेल