Shreya Maskar
बोरं बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, रवा, तीळ , वेलची पूड , खोबरे , पिठीसाखर, गूळ, तेल आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
बोरं बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ 10 मिनिटे भाजून मिक्सरला बारीक वाटून घ्या.
एका बाऊलमध्ये तांदळाचे पीठ आणि गरम पाणी ओतून छान ढवळून घ्या.
या पिठामध्ये रवा, भाजलेले तीळ, वेलची पूड, भाजेलेले खोबरे घालून मिक्स करून घ्या.
आता दुसऱ्या भांड्यात थोडे गरम पाणी, पिठीसाखर आणि गूळ घालून छान विरघळेपर्यंत ढवळत राहावे.
गूळ-पिठाच्या पाण्याच्या मदतीने तांदळाचे पीठ घट्ट मळून घ्या.
या तांदळाच्या पिठाचे छोटे गोळे करून तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस तळून घ्या.
दिवाळीत कोकणामध्ये बनवला जाणारा खास पदार्थ म्हणजे बोरं तयार झाली आहेत.