Shreya Maskar
गोवा स्टाइल वरण बनवण्यासाठी चणा डाळ, मसूर डाळ या डाळी लागतात.
हळद, मोहरी, जिरे, कढीपत्ता , तिखट आणि हिरवी मिरची इत्यादी मसाले लागतात.
टोमॅटो, ओलं खोबरं, तेल आणि गरजेनुसार पाणी गोवन वरण बनवण्यासाठी आवश्यक आहे.
कुकरला एक वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून शिजवून घ्या.
डाळ शिजल्यानंतर थोडी थंड झाली की त्यात चिरलेली हिरवी मिरची, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करा.
पदार्थावरून फ्रेश कोथिंबीर टाकायला विसरू नका.
आता खोबरं मिक्सरला छान वाटून त्यात हळद, थोडं पाणी घाला.
फोडणीसाठी पॅनमध्ये तेल घालून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता घालून फोडणी तयार करा.
डाळीच्या मिश्रणात खोबऱ्याचे मिश्रण टाका आणि एक उकळी आली की त्याला फोडणी द्या.
चमचमीत गोवा स्टाइल वरण तयार झाले.