Asthma  saam tv
लाईफस्टाईल

Health Issue: प्रियांका चोप्रा 'या' गंभीर आजाराने ग्रस्त, कशी घ्यावी काळजी जाणून घ्या सविस्तर

Asthma: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आजही तिच्या कामातून ग्लॅमरमधून इतरांना प्रभावित करते. मुळात अभिनेत्री होणं हे काही सोपं काम नाही.

Saam Tv

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आजही तिच्या कामातून ग्लॅमरमधून इतरांना प्रभावित करते. मुळात अभिनेत्री होणं हे काही सोपं काम नाही. त्यात सुंदरतेने फिटनेसला जपणं हे सुद्धा फार महत्वाचं असतं. त्यातच या अभिनेत्रीने एका प्रसिद्ध झालेल्या इंटरव्यूमध्ये तिच्या आजाराबद्दल चर्चा केली. त्यात तीने तिच्या नाकाच्या सर्जरीमुळे झालेले आजार यांबद्दल सांगितले. ती समस्या इतकी गंभीर होती की प्रियांकाला आजही त्या आजाराची भिती वाटते. चला तर जाणून घेऊ तो आजार कोणता आणि त्यावर उपाय काय आहेत?

प्रियांका चोप्रा कोणत्या आजारीशी लढत होती?

प्रियांका चोप्राने काही वर्षांपुर्वी तिच्या नाकाची सर्जरी केली होती. त्यात एक मोठी गफलत झाली होती. त्यामुळे तिला अस्थमा आणि डिप्रेशनशी लढावे लागले होते. अस्थमा यालाच दमा सुद्धा म्हणतात. त्यात कोरोनाचा काळ असल्याने तिला आणखी चिंता वाटत होती. कारण तिला अस्थमा होता. त्यातुन तिला बाहेर पडण्यासाठी जास्त काळ लागला होता.

दमा श्वासासंबंधीत गंभीर आजारात नेमकं काय होतं?

अस्थमा हा एक श्वासासंबंधीत जुणा आजार आहे. त्यात श्वसननलिकेत सुजन येते, श्वास घेताना त्रास होतो, छातीत दुखते, सतत खोकला येतो. ही लक्षणे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात जाणवतात. हा आजार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच होवू शकतो. त्यामुळे यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते.

अस्थमा आजार झाल्याने कोणता धोका निर्माण होवू शकतो?

डॉक्टरांच्या मते, अस्थमा आजारात श्वास घ्यायला त्रास होतो. याचे कारण म्हणजे वाढते प्रदूषण, जीवनशैलीतील बदल आणि इतर अनेक कारणांमुळे दम्याचा झटका येऊ शकतो. या दम्याचे आणखी वेगळे कारण आपण शोधले पाहिजे.

अस्थमा या आजारापासून लांब राहण्यासाठी काय करावे?

हेल्थ एक्सपर्टच्या मते, धुळीचे बारीक कण, परागकण, बुरशी आणि प्राण्यांचे केस या कारणांमुळे दम्याच्या रुग्णांना अ‍ॅलर्जी होते. त्यामुळे धुळीपासून या रुग्णांनी शक्य असेल तितके लांब राहावे. असे न केल्यास श्वास घेताना जळजळ आणि अरुंदता वाढू शकते. त्यामुळे बाहेर फिरतानाही तुम्ही मास्कचा वापर करणे फायदेशीर राहिल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT