Mumbai Air Pollution : मुंबई गुदमरतेय! हवा बिघडली, प्रदूषण वाढल्यानं ८ उपनगरांचा श्वास कोंडला

Air Pollution in Mumbai : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये वायूप्रदूषण वाढत आहे. हिवाळा आणि त्यात वाहनांमधून निघणारा धूर यामुळं प्रदूषण वाढत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवा प्रदूषणात वाढ, आठ उपनगरांची स्थिती अत्यंत गंभीर
Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवा प्रदूषणात वाढ, आठ उपनगरांची स्थिती अत्यंत गंभीरsaam tv
Published On

देशभरात वायू प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी दिल्लीसह अन्य महत्त्वाच्या शहरांमध्येही वायू प्रदूषणाची पातळी वाढत आहे. आर्थिक राजधानी मुंबईमध्येही विविध कारणांमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून वायू दूषित होत असल्याचे पाहायला मिळते आहे. अशातच मुंबईच्या १६ प्रमुख ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक (AQI) गुरुवारी दुपारी हा १९० च्या जवळ पोहोचला होता. त्यातही मुंबईतील २४ मॉनिटरिंग स्टेशन्सपैकी 'बोरिवली पूर्व, कुलाबा नेव्ही नगर, मालाड पश्चिम, माझगाव, चेंबूर, मानखुर्द शिवाजीनगर, कांदिवली पश्चिम आणि देवनार' या आठ ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा २३५ ते २९० म्हणजेच खराब स्थितीमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. सर्वसाधारणपणे २०० ते ३०० हा सरासरी गुणवत्ता निर्देशांक वायू प्रदूषणात वाढ झाल्याचे दर्शवते.

हिवाळा सुरु झाल्यापासून मुंबईमधील वायू प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. मंगळवारी २ प्रमुख भागांमध्ये हवेची गुणवत्ता खराब असल्याचे समोर आले. डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून एकूण स्टेशन्सपैकी ११ ठिकाणांमध्ये स्थिती बिकट असल्याची माहिती मिळाली आहे. वाढत्या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरुन मुंबई हायकोर्टाने चिंता व्यक्त केली आहे.

Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवा प्रदूषणात वाढ, आठ उपनगरांची स्थिती अत्यंत गंभीर
Mumbai Air Pollution: मुंबईच्या हवेची गुणवत्ता खूपच गंभीर, हायकोर्टाने व्यक्त केली चिंता; सरकारला सुनावले खडेबोल

वायू प्रदूषणावरुन हायकोर्टाने मुंबई महापालिकेला खडेबोल सुनावले आहेत. वाहतूक कोंडीमुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत असून वाहतुकीचे नियमन योग्य पद्धतीने होत नसल्याचेही हायकोर्टाने नमूद केले. या मुद्द्यावर आता लक्ष न दिल्यास भविष्यामध्ये त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात असेही हायकोर्टाने म्हटले आहे.

वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी, इमारतींसह रस्त्यांची कामे अशा अनेक कारणांमुळे मुंबईची हवा खराब होत आहे. प्रशासनाकडून त्यावर उपाय करूनही स्थिती गंभीर होत आहे. यात मुंबईकरांची घुसमट होत आहे. अनेकांना श्वसनाचे त्रास व्हायला सुरुवात झाली आहे. लहानांपासून ते वयस्कांपर्यंत सर्वांना वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे.

Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवा प्रदूषणात वाढ, आठ उपनगरांची स्थिती अत्यंत गंभीर
Air polution : हवेच्या प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका? स्मृतिभ्रंशही होतो? व्हायरल मेसेजमागचं सत्य?

तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यातील थंड वातावरणामध्ये हवेचा वेग मंदावत आहे. परिणामी अभिसरण प्रक्रियेचा वेगही कमी होतो आहे आणि त्यामुळे प्रदूषण वाढण्यासाठी पूरक स्थिती तयार झाली आहे. अशा स्थितीमध्ये स्वत:चा बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा, वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com