Pongal 2025  google
लाईफस्टाईल

Pongal 2025 : पोंगल म्हणजे नक्की काय? जाणून घ्या या सणाची पूजा विधी , शुभ मुहूर्त…

Pongal 2025 Date : ज्याप्रमाणे उत्तर भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो, त्याचप्रमाणे दक्षिण भारतात पोंगल हा मुख्य सण महत्त्वाचा मानला जातो. आता आपण 2025 मध्ये पोंगल कधी आहे? हे जाणून घेऊया.

Saam Tv

दक्षिण भारतातल्या तमिळनाडू मध्ये संक्रातीला पोंगल म्हणतात. या दिवशी लोक गाई-बैल यांची पूजा करतात आणि त्यांना विविध रंगानी सजवतात. या सणाला सुर्य देवाची पूजा आवर्जून करतात. तसेच नवीन पिकाच्या आनंदासाठी हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. चला तर जाणून घेऊ यंदा पोंगल किती तारखेला आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त काय आहे?

पोंगल सण का साजरो केला जातो?

पोंगल हा सण उत्तर भारतात मकर संक्राती, पंजाबमध्ये लोहरी, गुजरातमध्ये उत्तरायण , तमिळनाडू या राज्यांच्या आसपास साजरा केला जातो. हा सण सुख समृद्धीसाठी पूजा अर्चा करून साजरा करतात. या दिवशी निसर्गाचे आभार मानण्यासाठी लोक त्यासंबंधीत सगळ्यावस्तूंची छान सजावट करून पूजा करतात. या दिवशी अनेक कुटुंब, आजुबाजूचे सदस्य एकत्र येऊन पोंगल मोठ्या धाटात साजरा करतात.

ज्योतिषशास्त्राच्या शास्त्रानुसार महत्व

ज्योतिषशास्त्राच्या शास्त्रानुसार, हा सण हिवाळी संक्रांतीच्या समाप्तीचा संकेत देतो म्हणजे या दिवसापासून पुढे दिवस मोठे होऊ लागतात. हिवाळ्यातील संक्रांतीच्या काळात, सूर्य कमी कालावधीसाठी आकाशात राहतो तर रात्र जास्त असते. हा सण जास्त दिवसाच्या प्रकाशाच्या वेळेस सुरुवात करतो. दरवर्षी 14 जानेवारीच्या आसपास थाई पोंगल सण साजरा केला जातो. तसेच यंदा हा सण 14 जानेवारी २०२५ ला साजरा केला जाणार आहे.

पोंगल कसा साजरा केला जातो?

पोंगल हा मुख्यत: सूर्याच्या उपासनेचा सण आहे. पोंगलच्या पहिल्या दिवशी लोक सकाळी सनदीनंतर नवीन कपडे परिधान करतात.

पोंगल प्रसाद नवीन भांड्यात दूध, तांदूळ, काजू आणि गूळ एकत्र करून तयार करतात. त्यानंतर हा प्रसाद सुर्यदेवाला अर्पण केला जातो.

या दिवशी शेतकरी बैलांना अंघोळ घालतात आणि त्यांना सजवतात. या दिवशी घरात पडलेल्या जुन्या व खराब झालेल्या वस्तूही जाळून नवीन वस्तू घरी आणल्या जातात.


Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

SCROLL FOR NEXT