Snoring Treatment
Snoring Causesgoogle

Snoring Treatment : तुमच्या दररोजच्या घोरण्याच्या समस्येवर रामबाण उपाय, 'वेज कुशन' नेमकी आहे तरी काय?

Snoring Causes : घोरणे ही समस्या आपल्यासाठी खूप साधी आणि सवयीची झाली आहे. पण ज्याव्यक्तींना ही सवय असते त्यांना अनेक त्रास सहन करावे लागतात.
Published on

घोरणे ही समस्या आपल्यासाठी खूप साधी आणि सवयीची झाली आहे. पण ज्याव्यक्तींना ही सवय असते त्यांना अनेक त्रास सहन करावे लागतात. घोरण्याऱ्या व्यक्ती गाठ झोपेत गेल्या की, ते घोरायला सुरुवात करतात. त्याचा त्रास त्याच्या शेजाऱ्यांना सहन करावा लागतो. अशा वेळेस ते घराच्या बाहेर जाणे सुद्धा टाळतात. यात पण काही जण हलक्या आवाजात घोरतात तर काही जण मोठ्या आवाजात.

झोपेत सतत घोरणे त्रायदायक असते, पण आरोग्याबाबत समस्या असल्याचे देखील सूचित करते. ही समस्या टाळण्यासाठी त्याचे मुळ कारण शोधून, त्यावर उपचार करणे गरजेचे असते. याबाबत तज्ज्ञांनी 'वेज कुशन'चा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे घोरण्यापासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो. वेज कुशनने घोरणे कमी होते. कारण यामुळे तुमची झोपण्याची स्थिती बदलते. ही उशी तुमच्या शरीराची स्थिती सुधारते.

Snoring Treatment
Nutritious Food : उगाच का पौष्टीक खाण्यामागे पळताय? उत्तम पदार्थ तर तुम्ही रोजच्या आहारात जेवताय, तज्ज्ञांनीच उलगडलं रहस्य

हैदराबाद मधल्या ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार फिजीशियन डॉ. हरिचरण यांनी याबाबत सांगितले की. वैद्यकीय दृष्टीकोनातून वेज उशी घोरणे रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वेज कुशन डोके उंच करते, त्यामुळे हवेचा प्रवाह सुधारतो आणि हे अडथळे कमी होतात, असे डॉ. हरिचरण यांनी सांगितले. तुम्ही जेव्हा सरळ झोपता, तेव्हा घशाचे स्नायू आणि जीभ मागे सरकते त्यामुळे श्वासनलिकेतला अडथळा निर्माण होतो आणि माणसे घोरायला लागतात. या उशीचा वापर झोपताना केल्याने गुरुत्वाकर्षणामुळे वायूमार्ग खुला राहतो, ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते.

डॉ. हरिचरण यांनी पुढे असेही सांगितले की, वेज कुशन हलके ते मध्यम घोरणे कमी करू शकतात, परंतु ते सर्व प्रकारात फायदेशीर नाही. त्यासाठी जीवनशैलीतील बदल, वजन कमी करणे, झोपण्यापुर्वी अल्कोहोल टाळणे अशा काही गोष्टी वेज कुशनच्या वापरात पुरक आहेत. योग्य सल्ल्यासाठी आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जर तुम्ही खूप दिवसांपासून घोरत असाल तर घरगुती उपाय करण्याऐवजी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Written By : Sakshi Jadhav

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Snoring Treatment
Sprouts Recipes : झटपट बनवा 'ही' कडधान्य टिक्की अन् वाढवा शरीरातले व्हिटॅमिन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com