ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मकर संक्रात हा नवीन वर्षातला पहिला सण असतो. यासाठी महिलांकडून जय्यत तयारी केली जाते.
मकर संक्रांतीसाठी तुम्ही देखील घरात तिळाचे लाडू बनवणार असाल तर ही रेसीपी नक्की नोट करा.
सर्वप्रथम 500 ग्रॅम तीळ मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटे चांगले भाजून घ्या. नंतर तीळ एका ताटामध्ये काढून घ्या.
त्याच कढईत 250 ग्रॅम शेंगदाणे ॲड करुन मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटे भाजून घ्या. यानंतर शेंगदाणे सोलून घ्या. आणि मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या.
गरम कढईत 125 ग्रॅम सुके खोबरे मध्यम आचेवर चांगले परतून घ्या.
गरम कढईत 500 ग्रॅम चिक्कीचा गूळ ॲड करुन मध्यम आचेवर गूळ चांगला विरघळवून घ्या. नंतर त्यात 1.5 चमचा साजूक तूप ॲड करा. पाक व्यवस्थित झाला आहे का हे चेक करा.
पाकामध्ये बारीक केलेले शेंगदाणे, तीळ, 1 चमचा वेलची पावडर, 1/2 चमचा सुंठ पावडर ॲड करा आणि सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्या. आणि गॅस बंद करा.
तिळाचे सारण गरम असतानाच लाडू वळून घ्या. आणि हवेच्या ठिकाणी ताटात लाडू ठेवून थंड करून घ्या नंतर डब्यात भरून ठेवा.
NEXT: लाल की हिरवी शिमला मिरची? कोणती आहे अधिक फायदेशीर