Poha Paratha Saam TV
लाईफस्टाईल

Poha Paratha Recipe: नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळा आलाय? मग ट्राय करा पोहे पराठा

Breakfast Recipe in Marathi: पोहे पराठा बनवणे फार सोप्प आहे. त्यासाठी लागणारं साहित्य देखील कमी आहे. शिवाय पोह्यांचा हा पराठा खाल्ल्याने तुम्हाला दुपारपर्यंत भूक लागणार नाही.

Ruchika Jadhav

नाश्त्याला सकाळी झटपट तयार होणारा पदार्थ म्हणजे पोहे. प्रत्येक घरात पोह्यांचा नाश्ता बनतो. पोहे खाणे सर्वांना आवडते, मात्र दररोज पोहे खाऊन कंटाळा देखील येतो. आता तुम्हाला देखील रोजचे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी पोह्यांची एक वेगळी रेसिपी आणली आहे. ही रेसिपी लहान मुलांना देखील खूप आवडेल.

पोहे खायचे नसतील तर तुम्ही पोहे पराठा बनवू शकता. पोहे पराठा बनवणे फार सोप्प आहे. त्यासाठी लागणारं साहित्य देखील कमी आहे. शिवाय पोह्यांचा हा पराठा खाल्ल्याने तुम्हाला दुपारपर्यंत भूक लागणार नाही. चला तर मग रेसिपी जाणून घेऊ.

साहित्य

1 कप पोहे

दीड कप बेसन पीठ

दीड कप ओट्स पीठ

एक बारीक चिरलेला कांदा

एक बारीक चिरलेला टोमॅटो

हिरवी मिरची बारीक वाटून घ्या

हळद

मीठ

कोथिंबीर

धने जिरे पूड

तेल किंवा तूप

कृती

सर्वात आधी कांदे, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घ्या. त्यानंतर यामध्ये जिरे आणि धने पूड मिक्स करा. नंतर पोहे पाण्याने धुवून सर्व पाणी गाळून 5 मिनिटे झाकून ठेवा.

त्यांनतर पोह्यांमध्ये जिरे आणि धने पूड घालून घ्या. तसेच ओट्स आणि बेसन पीठ मिक्स करा. त्यानंतर मिक्सरला बारीक केलेलं मिश्रण यात टाका. सर्वांची चांगली कणीक मळून घ्या. त्यानंतर या पिठाचे पराठे लाटून घ्या.

लाटलेला पराठा मिडीयम टू लो फ्लेमवर शेकून घ्या. पराठा शेकत असताना त्यामध्ये तूप किंवा तेलाचा वापर करा. तयार झाला तुमचा टेस्टी पोहा पराठा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : नाशिक हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवले, दमदाटी केली; ५५ वर्षीय शिक्षकाची ९ वर्षीय मुलीवर वाईट नजर पडली अन्...

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये महापौर पद भाजपकडेच राहण्याची शक्यता

New Toll Rules: केंद्राचा महत्त्वाचा निर्णय! टोल भरला नाही तर वाहन विकता येणार नाही, नियम केले अजूनच कडक

Zodiac signs today: गुप्त नवरात्रीचा तिसरा दिवस कसा ठरेल? पंचांग आणि शुभ राशी जाणून घ्या

Biscuit Cake Recipe : केक खाण्याची इच्छा होतेय? मग १० रुपयांचा बिस्किटचा पुडा घ्या अन् 'ही' रेसिपी बनवा

SCROLL FOR NEXT