भारतात विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ खाल्ले जातात. ज्या ठिकाणी जे धान्य जास्त पिकते त्यानुसार तेथील व्यक्तींची खाण्यापिण्याची सवय वेगळी असते. अशात सर्वच राज्यांमध्ये पराठा फार कॉमन आहे. याच पराठ्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
नश्त्यामध्ये किंवा अगदी दुपारच्या जेवणात देखील अनेक जण पराठा खातात. आजवर तुम्ही आलुपराठा, मेथी पराठा आणि विविध भाज्या असलेला पराठा बनवला आसेल आणि खाल्ला असेल. आता पराठा बनवताना कोणीच तो ऑईल फ्री खात नाहीत. प्रत्येकाला खमंग भाजलेला किंवा शॅलो फ्राय केलेला पराठा खावा वाटतो. त्यामुळे तुम्ही आजवर तेलात किंवा मग तुपात बनवलेला किंवा बटरमध्ये भाजलेला पराठा नक्की खाल्ला असेल.
मात्र तुम्ही कधी डिझेलमध्ये बनवलेला पराठा खाल्ला आहे का?, नक्कीच नाही. मात्र चंदीगडमध्ये एका ढाब्यावर हा पराठा मिळत आहे. काहीतरी हटके म्हणून या व्यक्तीने थेट डिझेल ओतून त्यावर पराठा बनवला आहे. @nebula_world या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. व्हिडीओपाहून सर्वच नेटकरी थक्क झाले आहेत.
व्हिडीओ पोस्ट करत यावर कर्करोगाला आमंत्रण देणारा पराठा असं कॅप्शन देखील लिहिण्यात आलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पराठा बनवणारे ढाबा मालक स्वतः या बद्दल माहिती देत आहेत. त्यांनी सुरुवातीला पराठा लाटून घेतला आहे त्यांनतर तो तव्यावर शेकला. नंतर त्यावर भरपूर डिझेल ओतून हा पराठा तळून काढला आहे. हा अनोखा प्रताप करत असताना हा पराठा एकदा खाल तर अनेकवेळा तेथे पराठा खाण्यासाठी याल इतकी चांगली याची चव असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी किंवा आपल्या हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी वाढावी यासाठी हॉटेल किंवा ढाबा मालक काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. काही ठिकाणी काही दिवसांपूर्वी विविध थाळ्या चर्चेत आल्या होत्या. त्यात सबसे कतील गौतमी पाटील हिच्या नावाची देखील थाळी बनवण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.