Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Desi Jugad Viral Video: एका व्यक्तीने कारमध्येच उसाच्या रसाची मशीन बसवली आहे. ही कार तो गावोगावी फिरवत ऊसाचा रस विकतो. या व्यक्तीची ही क्रिएटिव्हिटी पाहून नेटिझन्सही हैराण झाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटिझन्स त्याचे कौतुक करत आहेत.
Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा
Desi Jugad Viral VideoSaam Tv

सोशल मीडियावर (Social Media) देसी जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. अनेकाची क्रिएटिव्हिडी खूपच जबरदस्त असते. हे व्यक्ती कमी खर्चात अशा वस्तू बनवतात की त्यांच्या कल्पनाशक्तीची कमालच असते. अशाप्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि ते पाहून प्रत्येक जण थक्क होतो. अनेकवेळा या लोकांची क्रिएटिव्हिटी पाहून उद्योगपती आनंद महिंद्राही त्यांची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका व्यक्तीने कारमध्येच उसाच्या रसाची मशीन बसवली आहे. ही कार तो गावोगावी फिरवत ऊसाचा रस विकतो. या व्यक्तीची ही क्रिएटिव्हिटी पाहून नेटिझन्सही हैराण झाले आहेत. या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटिझन्स त्याचे कौतुक करत आहेत.

आतापर्यंत तुम्ही आपल्या कारमध्ये किंवा टेम्पोमध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले पाहिले असतील. पण ज्यूस डिस्पेंसर लावलेले तुम्ही कधी पाहिले नसेल. पण या व्हायरल व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आपल्या कारच्या डिक्कीमध्ये ऊसाच्या रसाचे मशीन बसवलेले दिसत आहे. त्यानंतर काही वेळातच अनेक ग्राहक ऊसाचा रस पिण्यासाठी त्याठिकाणी आलेले दिसतात. व्हिडीओमध्ये ही व्यक्ती ऊसाचा रस काढताना दिसत आहे. तुम्ही सोशल मीडियावर आतापर्यंत देसी जुगाडशी संबंधित बरेच व्हिडिओ पाहिले असतील पण असा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहिला असेल.

हा व्हिडिओ @ChapraZila नावाच्या X हँडलवर शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'भारतात काहीही शक्य आहे. कारमध्ये उसाचे मशीन बसवले आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटकरी या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'चांगले कौशल्य.' दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, 'काय जबरदस्त डोकं आहे.'

Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा
Viral Video: घोडा शर्यतीदरम्यान टांगा उलटला; घोडे रस्त्यावर घसरले, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com