Breakfast Ideas: लहान मुलांना रोज सकाळी नाष्टा काय द्यावा हा प्रश्न पडतोय? तर हे पदार्थ नक्की ट्राय करुन पहा

Breakfast Ideas For Children: घरातील लहान मुलांना कायम बाहेरील पदार्थ खाण्यास आवडतात. मात्र जर तुम्ही मुलांना खाली दिलेले पदार्थ करुन खाण्यास द्या.जे मुलं आवडीनेही खातील आणि त्याच्यां आरोग्यासाठी ते चांगले ठरतील.
Breakfast Ideas For Children
Breakfast IdeasSaam Tv

सकाळ होताच प्रत्येक गृहीणी सकाळच्या नाश्त्याची तयारी करते. यात मु्ख्य प्रश्न असतो तो म्हणजे नाश्ताला काय करावे. जर घरात लहान मुलं असेल की त्यांना आवडणारे आणि सोबत काही पौष्टिक असणारे पदार्थ नाश्ताला करावे लागतात. त्यासाठी आम्ही काही नाश्तासाठी काही पदार्थ सांगत आहोत,जे तुम्ही एकदा करुन पाहावेत. जे तुम्हाला मुलांची शाळा सुरु झाल्यावर देखील देऊ शकतात.

Breakfast Ideas For Children
Lifestyle To Prevent Cancer: कर्करोग टाळाण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' छोटे बदल

पराठा

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना पराठा खाण्यास आवडतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पराठा हा झटपट होणारा आणि सोप्प्या पद्धतीने होऊन जातो. तुम्ही पालक पराठा, मेथी पराठा, कोबी पराठा, दुधी , गाजर आणि बीट, बटाटा अशे विविध पद्धतीचे पराठा मुलांना नाश्ताला देऊ शकता. पराठ्यासोबत तुम्ही मुलांना दही किंवा सॉस किंवा लोणचेही देऊ शकता.

विविध धान्यांचे डोसे

अनेकदा मुलांना तुम्ही विविध धान्यापासून बनवणारे डोसे देऊ शकता. ते खाण्यासही मुलांना आवडता शिवाय मुलांसाठी अतिशय पौष्टिकही ठरतात.

सलाड

सकाळच्या नाश्तासाठी प्रत्येकाच्या नाश्त्यासाठी सलाड हा उत्तम पर्याय आहे. सलाड आणखी चवीदार होण्यासाठी तुम्ही गाजर ,काकडी , टोमॅटो सह त्यात पनीर , मशरुमही टाकू शकता.

व्हेज फ्राईड राईस

मुलांना शक्यतो बाहेरील पदार्थ खाण्यास जास्त आवडतात. त्यासाठी तुम्ही मुलांना कधीतरी व्हेज फ्राईड राईस खाण्यास देऊ शकतात. व्हेज फ्राईड राईस बनवताना तुम्ही त्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्याही टाकू शकता.

वाटाण्याचे कटलेट

वाटाण्याचे कटलेच बनवण्यासही एकद सोप्पे आणि खाण्यासही चवदार आहेत. सकाळी नाश्त्यासाठी मुलांना तुम्ही वाटाण्याचे कटलेट बनवून देऊ शकता.

Breakfast Ideas For Children
Healthy Lifestyle: रात्री उशीरा जेवल्याने आरोग्य सुधारतं की बिघडतं? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com