Mahashivratri 2026 Saam Tv
लाईफस्टाईल

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला या ५ घटकांनी करा शिवलिंगावर अभिषेक; आयुष्यभर राहील महादेवाची कृपा

Mahashivratri Shivling abhishekam: महाशिवरात्री हा भगवान शिवाचा सर्वात महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केल्याने आयुष्यभरासाठी भगवान शिवाचे आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं.

Surabhi Jayashree Jagdish

महाशिवरात्री हा सण भगवान शिवाच्या भक्तीचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी केवळ पूजा किंवा उपवास केला जात नाही तर हा दिवस आध्यात्मिक शांती, मानसिक स्थिरता आणि जीवनात संतुलन साधण्याची संधी देखील देतो. असं मानलं जातं की, या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतात.

शिवाला पाण्याचा देव मानण्यात येतं म्हणून वेगवेगळ्या घटकांनी त्यावर अभिषेक करण्याची परंपरा आहे. प्रत्येक घटकाचं स्वतःचं महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित फायदे आहेत. योग्य पद्धतीने केल्यास यामुळे जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.

पाण्याचा अभिषेक

महाशिवरात्रीच्या दिवशी प्रथम शिवलिंगाला स्वच्छ पाणी अर्पण केलं जातं. पाण्याने अभिषेक केल्याने मनाला शांती मिळते आणि नकारात्मक विचार कमी होतात. तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करणं योग्य मानण्यात येतं. हा अभिषेक सकाळी करणे चांगले.

कच्च्या दुधाने शिवलिंगावर अभिषेक करावा का?

दुधाने अभिषेक करण्याची परंपरा खूप जुनी आहे. असं म्हटलं जातं की, यामुळे शारीरिक समस्यांपासून आराम मिळतो. मात्र यावेळी दूध उकळलेलं नाही ना याची खात्री करा.

मध अभिषेकाचे फायदे

जर तुमच्या जीवनात वारंवार अडचणी येत असतील किंवा तुमचं सतत भांडण होत असेल तर मधाने अभिषेक करणं फायदेशीर मानलं जातं. यावेळी जास्त मध वापरणे टाळा.

पंचामृताचा अभिषेक

पंचामृत दूध, दही, तूप, मध आणि साखर मिसळून बनवलं जातं. महाशिवरात्रीला हा अभिषेक केल्याने आनंद आणि समृद्धी येते. हा अभिषेक दिवसाच्या कोणत्याही वेळी करता येतो.

उसाच्या रसाने अभिषेक कधी करावा?

ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा. हा रस ताजा असावा. त्यामुळे कामामध्ये स्थिरता येते असं मानलं जातं.

बेलपत्र आणि फुलं

अभिषेक केल्यानंतर, शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करा. तीन पानांचा बेलपत्र सर्वोत्तम मानलं जातं. पांढरी फुलं, धोत्रा आणि शमीची पानं देखील अर्पण केली जातात. यावेळी बेलपत्र उलटं ठेवू नका.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT