

नवग्रहांमध्ये सूर्याला विशेष स्थान देण्यात येतं. ग्रहांचा राजा सूर्य आत्मा, पिता, इच्छाशक्ती, आरोग्य, नेतृत्व क्षमता, प्रशासनिक कौशल्य आणि जीवनातील उद्दिष्ट यांचा कारक मानला जातो. त्यामुळे सूर्याच्या स्थितीत होणारा बदल प्रत्येक राशीच्या जीवनावर काही ना काही प्रकारे परिणाम करत असतो. सूर्य निश्चित कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदलतो आणि त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येतो.
सध्या सूर्य वृश्चिक राशीत असून मंगल आणि बुधासोबत विराजमान आहे. त्यामुळे मंगल आदित्य योग आणि बुधादित्य योगासह त्रिग्रही योग तयार झाला आहे. 19 नोव्हेंबर रोजी सूर्य विशाखा नक्षत्रातून बाहेर पडून अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. पुत्र आणि शत्रूच्या नक्षत्रात सूर्याच्या आगमनामुळे काही राशींना लाभ मिळणार असून काहींना सावध राहण्याची गरज आहे.
वैदिक ज्योतिषानुसार सूर्य 19 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजून 3 मिनिटांनी अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यावेळी 3 डिसेंबरपर्यंत सूर्य तिथेच राहणार आहे. त्यानंतर तो ज्येष्ठा नक्षत्रात गोचर करणार आहे. यावेळी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. जीवनातील दीर्घकाळापासून असलेल्या अडथळ्यांचा निरास होईल. आत्मविश्वास वाढणार आहे आणि मंगलासोबत सूर्याची युती झाल्यामुळे साकारात्मक ऊर्जा वाढणार आहे. धनलाभासोबत गुंतवणुकीच्या उत्तम संधी मिळतील. प्रत्येक कामातून तुम्हाला चांगला पैसा मिळणार आहे.
सूर्यदेव अनुराधा नक्षत्रात प्रवेश करून मिथुन राशीच्या छठ्या भावात राहणार आहे. या राशीच्या लोकांसाठी भाग्याची साथ मिळणार आहे. अष्टम भावात गुरुची दृष्टि असल्यामुळे गुप्त धन मिळेल आणि अडकलेले पैसे परत मिळणार आहे. सूर्याची स्थिती मजबूत असल्यामुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळणार आहे. व्यापारातही चांगला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली बातमी मिळू शकणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.