Exam Tips  Saamtv
लाईफस्टाईल

Exam Tips : मुलांना परिक्षेत चांगले मार्क मिळवून द्यायचेयेत? मग करा या टिप्स फॉलो

Parenting Tips : सध्या मुलांच्या परिक्षेचे दिवस सुरू झाले आहेत. जेव्हा मुलांच्या परिक्षा सुरू होतात तेव्हा पालक सुद्धा त्यांच्या इतकेच चिंतेत असतात. प्रत्येक पालकांना असच वाटतं की, त्यांच्या मुलाने परिक्षेत उत्तीर्ण व्हावं.

Saam Tv

सध्या मुलांच्या परिक्षेचे दिवस सुरू झाले आहेत. जेव्हा मुलांच्या परिक्षा सुरू होतात तेव्हा पालक सुद्धा त्यांच्या इतकेच चिंतेत असतात. प्रत्येक पालकांना असच वाटतं की, त्यांच्या मुलाने परिक्षेत उत्तीर्ण व्हावं. खूप अभ्यास करावा. योग्य वेळापत्रक फॉलो करावे. तुम्हाला आम्ही अशाच खास आणि वर्क होणाऱ्या Parenting Tips देणार आहोत. त्याचा वापर मुलांच्या उज्वल भविष्यासाठी होईल.

मुलांना अभ्यासाचे महत्व समजवा

लहान मुलांना जोपर्यंत अभ्यासाचे महत्व समजत नाही तो पर्यंत ते मनापासून अभ्यास करणार नाहीत. अभ्यासाचा वापर कसा आणि कुठे होतो? हे मुलांना समजावणे फार महत्वाचे आहे. त्यात अभ्यास केल्याने भविष्यात होणारा मोठा फायदा त्यांना समजावला पाहिजे. हे एकदा का मुलांना कळलं तर ते आपसूक अभ्यासाला बसतील आणि मनापासून अभ्यास करतील. त्याने मुलं परिक्षेत हमखास चांगल्या गुणांनी पास होतील.

अभ्यासाविषयीचा उत्साह वाढवा

अभ्यास हा मुलांना नेहमीच कंटाळवाणा वाटत असतो. त्यामुळे त्यांना मजेशीर पद्धतीने अभ्यास शिकवा. त्याचसोबत रोज किमान अर्धा तास मुलांसोबत तुम्ही सुद्धा अभ्यासाला बसा. त्याने मुलांना काय अडथळे येतील हे तुम्हाला कळेल. तुम्ही अभ्यासाचे वेळापत्रक आखायला मदत करा. त्याने खाण्यापिण्याच्या गोष्टींसुद्धा तुम्हाला कळतील. त्यांच्या खेळण्याला सुद्धा तुम्ही महत्व देताय असे त्यांना भासवून द्या.

अभ्यास करताना ब्रेक घेणे

अभ्यास करताना मुलं त्यावर पुर्ण लक्ष देतात. पण त्यांनी ३० ते ४० मिनिटांनी ब्रेक घेणं आवश्यक आहे. त्याने मुलं अभ्यासाला कंटाळत नाहीत. किमान १० मिनिटांचा त्यांनी ब्रेक घेतला पाहिजे. या ब्रेकमध्ये त्यांनी गाणी न ऐकता. जरा चालले पाहिजे. पाणी पित राहिले पाहिजे. तसेच मोबाईल आणि टिव्हीपासून लांब राहिले पाहिजे. अशाने मुलं व्यवस्थित अभ्यास करतील आणि परिक्षेत सुद्धा उत्तीर्ण होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक

Belly Fat: थुलथुलीत पोटाची चरबी कमी करायचीये? व्यायामासोबत हे ४ टेस्टी ड्रिंक्स प्या, पोट होईल सपाट

पांढऱ्या रंगाचीच का असते टॉयलेट सीट? कारण ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Local Body Election: निवडणुका होणार, पण उमदेवारावर टांगती तलवार; ५७ ठिकाणचा निकाल न्यायप्रविष्ठ

Health Care Drink: थंडीत नक्की प्या हे हेल्दी ड्रिंक, होणार नाहीत सर्दी खोकला ताप सारखे आजार

SCROLL FOR NEXT