Winter Skin Care : हिवाळ्यात कोरडेपणा आल्याने हात आणि पायांची त्वचा फाटतेय, मग या चुका करणं आत्ताच टाळा

Soft Skin Secrets : जानेवारी महिना असल्याने थंडीने कहर सुरू केला आहे. आज परिस्थिती अशी आहे की धुक्यामुळे घराबाहेर काहीही दिसणे अशक्य झाले आहे. या ऋतूत त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर समस्या वाढतात.
Winter Skin Care
Soft Skin Secrets Google
Published On

जानेवारी महिना असल्याने थंडीने कहर सुरू केला आहे. आज परिस्थिती अशी आहे की धुक्यामुळे घराबाहेर काहीही दिसणे अशक्य झाले आहे. या ऋतूत त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर समस्या वाढतात. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना थंडी असो किंवा ऊन घराबाहेर पडावेच लागते. त्याने आपल्या स्कीनवर लगेच परिणाम दिसू लागतो. आपली त्वचा इतकी कोरडी होते की, ती फाटायला लागते.

हिवाळ्यात त्वचा अघरगुती उपायांचा अवलंब करा

जर तुमची त्वचेला खूप तडे जात असतील तर तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता. याच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावरील ओलावा कायम राहील. यासाठी ज्यात ओलावा असेल तसे घटक एकत्र करून फेस पॅक बनवा. या सोप्या उपायांनी तुम्ही हिवाळ्यात तुमच्या त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवू शकता आणि कोरडेपणाची समस्या टाळू शकता.

Winter Skin Care
Dark Chocolate : तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण डार्क चॉकलेट खाल्ल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

विशेषत: ज्या लोकांची त्वचा कोरडी असते, त्यांना त्यांच्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना त्वचेच्या कोरडेपणाचा त्रास होत असेल तर तुम्हाला विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेचा कोरडेपणा दूर करू शकता.

मॉइश्चरायझर वापरा

हात-पायांमध्ये जास्त कोरडेपणा असल्यास आंघोळीनंतर आणि झोपण्यापूर्वी त्वचेवर जाड मॉइश्चरायझर लावा. खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा बदाम तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करतात. आपण हे देखील वापरू शकता.

कोमट पाण्याने आंघोळ करा

हिवाळ्यात लोक आंघोळीसाठी खूप गरम पाण्याचा वापर करतात, परंतु असे करू नये. कधीही खूप गरम पाण्याने आंघोळ करू नका, कारण त्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा निघून जातो. आंघोळीचे पाणी नेहमी कोमट असावे. याशिवाय आंघोळीसाठी सौम्य आणि मॉइश्चरायझिंग साबण वापरा.

स्क्रबिंग टाळा

हिवाळ्यात स्क्रबचा जास्त वापर केल्यास त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. जर तुम्हाला स्क्रब करायचे असेल तर आठवड्यातून एकदाच हलका स्क्रब वापरा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.

रात्री

झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर किंवा तेल लावा आणि मग मोजे आणि हातमोजे घाला. एलोवेरा जेल किंवा ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याचे मिश्रण देखील त्वचेला खोल पोषण देते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Winter Skin Care
Drinking Water : पाणी पिताना फक्त 'या' गोष्टींकडे द्या लक्ष, मधुमेह, कॅन्सरसारख्या आजारांपासून राहाल दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com