ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात ओठ अनेकदा ड्राय होतात आणि फाटतात. त्यामुळे ओठांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
जर तुम्हालाही गुलाबी ओठ हवे असतील तर घरातल्या घरातच तुम्ही हे स्कब बनवून वापरु शकता. यामुळे तुमचे ओठ सॅाफ्ट होतील.
कॅाफीमध्ये मध मिक्स करुन ओठावर काही मिनिटे मसाज करा. यामुळे ओठ सॅाफ्ट होतील.
हळद आणि दूध मिक्स करुन ओठांवर लावल्यास ओठांवरील काळेपणा दूर होतो.
मध आणि साखर एकत्र मिक्स करुन स्क्रब तयार करा. यामुळे ओठांवरील डेड स्कीन सेल्स निघून जातात.
तुम्ही कोरफड आणि साखर एकत्र मिक्स करुन हा स्क्रब ओठांवर लावू शकता.
खोबरेल तेल आणि कॅाफी मिक्स करुन स्क्रब तयार करा. आणि आठवड्यातून दोनदा हा स्क्रब वापरु शकता.
बीटच्या रसमध्ये साखर मिक्स करुन ओठांवर मसाज करा. यामुळे ओठ सॅाफ्ट आणि गुलाबी होतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: पोंगल स्पेशल बनवा 'या' पाच साऊथ इंडियन डिशेस