Parenting Tips Saam tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : पालकांनो, उठता-बसता मुलं सतत फोन पाहाताय? काही केल्या ऐकत नाहीये ? रागवू नका, याप्रकारे सोडवा हे व्यसन

कोमल दामुद्रे

Signs Of Smartphone Addiction In Children : स्मार्टफोन जितका चांगला तितकाच तो घातक. झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्यांचा सोबती असेल तर तो स्मार्टफोन. अनेक महत्त्वाच्या कामांपासून ते सोशल मीडियावर कनेक्ट राहाण्यापर्यंत स्मार्टफोन उपयोगी पडतो.

अनेकांना तर त्याला टॉयलेटमध्ये घेऊन जाण्याची देखील सवय आहे. परंतु, याचा वापर मोठेच नाही तर हल्ली लहान मुलांना देखील जडल आहे. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सतत स्मार्टफोनमुळे डोके खुपसून बसल्यामुळे मुलं हे इतर अॅक्टिव्हिटी करत नाही. ना त्यांना खाण्याचे भान असते तर ना त्यांना झोपण्याचे त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ लागतो. मुलांचे हे वाईट व्यसन सोडवण्यासाठी पालकांनी काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्यातून त्यांची सुटका नक्कीच होऊ शकते.

1. मैदानी खेळ

मुलांना स्मार्टफोनपासून (Smartphone) लांब ठेवण्यासाठी पालकांनी त्यांना मैदानी खेळाची आवड लावयला हवी. त्यांना नेमका कोणता खेळ खेळायला आवडतो ते पाहा. खेळासोबतच त्यांची आवड निवड देखील जपा. त्यांना पोहणे, सायकलिंग (Cycling) किंवा मार्शल आर्ट्स तसेच फुटबॉल, बास्केटबॉल किंवा टेनिससारखे खेळ खेळण्यास देऊ शकता. स्मार्टफोनचा वापर कमी करण्यात मदत करतील. तसेच त्यांना खेळण्याची सवय लागेल.

2. निसर्गाचा अनुभव

तुमच्या मुलाला स्मार्टफोनपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही त्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाऊ शकता. यासाठी त्यांना हायकिंग, कॅम्पिंग, बागकाम यासारख्या फिटनेसच्या (Fitness) गोष्टी करण्यास प्रोत्साहित करा.

3. पुस्तक वाचन

मूल मोबाईलवर जास्तीत जास्त वेळ घालवत असतील तर तुम्ही या सवयीपासून सोडवण्यासाठी त्यांना वाचनाची सवय लावा. यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला रोज काहीतरी वाचण्याचे काम देऊ शकता आणि नंतर त्यांच्यासोबत बसून या पुस्तकावर चर्चा करू शकता. असे केल्याने, तुमच्या मुलांची स्मार्टफोन वापरण्याची सवय सुटेल.

4. वेळ कसा मार्गी लावाल

तुमच्या मुलाला स्मार्टफोनपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना विविध कला उपक्रमांमध्ये सहभागी करून घेऊ शकता. मुलाला लेखन, वाद्य वाजवणे किंवा चित्रकला इत्यादी गोष्टी करण्यास प्रोत्साहित करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT