Child Care Tips : मुलांना आपण ज्याप्रकारे शिकवू त्याप्रमाणे ते वागतात. हल्लीची मुले जन्माला आल्यानंतर ते लगेच शिकण्यास सुरुवात करतात. त्यांची बुद्धी इतकी तल्लख असते की, कोणतीही गोष्ट ते पटकन डोक्यात ठेवतात.
असं म्हटले जाते की, मडके बनवताना जर त्याला योग्य आकार दिला तर ते चांगले बनते तसेच काहीसे मुलांच्या बाबतीत असते. मुलांला चांगले व योग्य वळण लावण्याचे काम हे बालवयापासूनच असते. पाच वर्षांच्या मुलांना समजू लागते की काही गोष्टी आहेत ज्या त्यांना स्वतःच करायच्या आहेत. मूल पाच वर्षांचे झाल्यावर त्याला स्वतःहून काही गोष्टी कराव्या लागतात जसे दात घासणे, आंघोळ करणे आणि शाळेची तयारी करणे. अशा काही गोष्टींमुळे मुलं स्वत:ची कामे स्वत: करायला शिकतात. जाणून घेऊया अशा काही चुकांबद्दल ज्यामुळे मुलांचा मेंदूवर परिणाम होतोय
2. अधिक हट्टी होणे
हल्लीची मुलं जितकी हुशार तितकीच हट्टी. जर पालक मुलांसमोर एखाद्या गोष्टीसाठी हट्टीपणा करत असतील तर ते देखील त्याच पद्धतीने वागू लागतात. तसेच वाईट मार्गाला लागतात.
3. पालकांनी काय करायला हवे ?
या वयात मुले नेमके काय वागतात हे त्यांना समजत नसते. त्यामुळे त्यांच्याशी वागताना धीर धरा. काही गोष्टी त्यांच्या बाजूने समजून घेतल्यास व प्रेमाने (Love) सांगितल्यास ते नक्कीच ऐकतील
4. चर्चा करा
मुले जर अतिहट्टीपणा करत असतील तर त्यांच्याशी शांतपणे बसून बोला. बोलल्याने प्रश्न सुटतात, त्यांच्या चुकीच्या गोष्टींचा हट्ट पूर्ण करु नका. याशिवाय पुरेशी झोप किंवा विश्रांती न मिळाल्यानेही मूल चिडचिड होते. तुम्ही त्याच्या झोपेचा नित्यक्रम करा म्हणजे त्याच्या वागण्यात चिडचिड होऊ नये. मुलाला स्वतःची निवड करण्याची संधी द्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.