कोमल दामुद्रे
लहान मुलांना हुशार बनवण्यासाठी चांगल्या पॅरेंटिंगसोबत सकस आहारही खूप महत्वाचा आहे.
मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी सकस आहाराचे सेवन करणे गरजेचं आहे.
मुलांचे ब्रेन बूस्ट करण्यासाठी त्यांच्या आहारात या ५ पदार्थांचा अवश्य समावेश करा.
मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कोणते आहेत ते सुपरफुड्स पाहूयात
दह्यामध्ये आयोडीन असते, जे कॉग्निटिव फंक्शन व मेंदूच्या विकासासाठी मदत करते.
पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारची संयुगे असतात, ज्यामुळे मेंदू सुरक्षित राहते. यामध्ये फोलेट, फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनॉइड्स, व्हिटॅमिन ई, के आढळते.
शेंगा आणि बीन्स अतिशय आरोग्यदायी सुपरफूड आहे. ज्यामुळे मेंदूला अनेक प्रकारे फायदा होतो.
मुलांना दररोज गहू, बार्ली, तांदूळ, राजगिरा, ओट्स इत्यादी धान्यांपासून तयार केलेले पदार्थ खायला द्या.
सुकामेव्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा -3 भरपूर प्रमाणात आढळते. जे मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे.