पपयी आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. पपयीचे सेवन केल्याने व्यक्ती जास्त काळ तरुण दिसतात असं म्हटलं जातं. तुम्ही सुद्धा पपयी आवडीने खात असाल. पपयी मऊ आणि अगदी गोड असते. त्यामुळे याची चव प्रत्येकाला आवडते. तुम्हाला सुद्धा पपयी आवडत असेल किंवा नसेल तर तुम्ही पपयीपासून तयार होणार चवदार हलवा एकदा नक्की ट्राय केला पाहिजे.
आजवर तुम्ही गाजर हलवा, दुधी हलवा खाल्ले असेल. तर तुम्ही कधी पपयी हलवा खाल्ला आहे का? पपयी हलवा चवीला तर उत्तम आहेच. शिवाय आपल्या आरोग्यासाठी देखील पपयी हलवा फार फायदेशीर आहे. त्यामुळे आज या बातमीमधून पपयी हलवा कसा बनवायचा याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.
साहित्य
पपयी - १
दूध - १/२ लिटर
साखर - १/२ कप
ड्राय फ्रूट्स - १ चमचा
वेलची पावडर - १/४ चमचा
शुद्ध तूप - २ चमचे
पपयी हलवा कसा बनवायचा?
पपयी हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी पपयीच्या साली काढून घ्या. त्यानंतर पपयीचे मोठ्या मोठ्या आकारात तुकडे करून घ्या.
पुढे एक जाड कढई घ्या आणि यात तूप टाकून गरम होण्यासाठी गॅसवर ठेवा.
तूप गरम होत आहे तोपर्यंत ड्रायफ्रूट्स थोडे बारीक कापून घ्या. त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स तेलात टाकून तळा.
ड्रायफ्रूट्स जास्त काळे करू नका. हलके गोल्डन ब्राउन झाल्यावर ते बाहेर एका प्लेटमध्ये काढून घ्या.
पपयीचे जाड तुकडे या कढईमध्ये टाकून घ्या. पपयीचे तुकडे कढईत टाकल्यावर ते एका मोठ्या चमच्याच्या सहाय्याने मीडिअम गॅसवर शिजवून घ्या.
पपयी अतीशय मऊ असते. त्यामुळे तुम्ही कढईत टाकल्यावर चमच्याने ती बारीक आणि पातळ करून घ्या.
पपयीमध्ये पुढे साखर मिक्स करा. तसेच फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स सुद्धा मिक्स करून घ्या. स्वादानुसार यामध्ये वेलची पावडर सुद्धा मिक्स करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.