ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बेसन, साखर, तूप, दूध, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स
सर्वप्रथम एक कढईमध्ये तूप घेऊन गरम करा. त्यानंतर त्यामध्ये बेसन टाका आणि मंद आचेवर व्यवस्थित लालसर होईपर्यत भाजून घ्या.
त्यानंतर त्यामध्ये साखर दूध टाकून व्यवस्थित मिश्रणात एकजीव करून घ्या.
मिश्रण एकजिव केल्यानंतर वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घालून गॅस बंद करा.
त्यानंतर एका प्लेटला तूप लावून तयार बेसनाचे मिश्रण त्यामध्ये ओता आणि नीट एकसमान पसरवून घ्या.
त्यानंतर त्याच्यावरती ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालून सेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा
मिश्रण सेट झाल्यानंतर चाकूच्या मदतीने वड्या पाडून घ्या त्यानंतर प्लेटमध्ये सजवून या वड्या खाण्यासाठी सर्व्ह करा