Gajar Halwa: घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा लालबूंद गुळाचा गाजर हलवा; रेसिपी पाहा

Gajar Halwa Recipe: अनेकांच्या जेवणानंतर गोडाचा पदार्थ खायची सवय असते. गोडाच्या पदार्थात तुम्ही गाजराचा हलवा बनवू शकता. गुळाचा गाजर हलवा बनवण्याची सोपी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Gajar Halwa
Gajar HalwaSaam Tv
Published On

Jaggery Gajar Halwa Recipe:

जेवण झाल्यावर अनेकांना गोड पदार्थ खायची सवय असते. गोडाच्या पदार्थाशिवाय जेवण पूर्ण होत नाही. त्यासाठी अनेकजण गुलाबजाम, रस्सगुल्ला, हलवा खातात. त्यासाठीच आज आम्ही तुम्हाला गुळाच्या गाजराच्या हलव्याची रेसिपी सांगणार आहे.

थंडीच्या दिवसात बाजारात गाजर जास्त प्रमाणात असतात. लालसर गाजराचा हलवा खायला अतिशय चविष्ट असतो. गाजराचा हलवा बनवायला जरी थोडा वेळ लागत असेल तरी खायला मात्र खूप चविष्ट आणि गोड असतो. आज आम्ही तुम्हाला याच गाजराच्या हलव्याची रेसिपी सांगणार आहोत. (Latest News)

साम्रगी

  • गाजर

  • मिल्क पावडर

  • दूध

  • गुळ

  • साजूक तूप

  • वेलची जायफळ पूड

  • काजू

  • बदाम

  • मनूके

कृती

  • सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याला किसून घ्या.

  • यानंतर एका गॅसवर दूध ठेवा. तर दुसऱ्या बाजूला तव्यावर गाजर परतून घ्या.

  • मिल्क पावडर थोड्या दूधात मिक्स करुन घ्या. त्यानंतर मिल्क पावडर आणि त्यात उकळलेले दूध दोन्ही मिक्स करा. यानंतर त्यात किसलेले गाजर टाका.

  • दुध पूर्णपणे आटेपर्यंत शिजवून घ्या.

  • हे मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात गुळ टाकून शिजवून घ्या. त्यावर काजू, बदामाचे काप घाला. त्यानंतर वेलची जायफळ पूड घाला. यानंतर तुम्ही छान गार्निश करुन हलवा खाऊ शकता.

Gajar Halwa
इंटरनेट नसताना G-MAIL ऑफलाईन कसं वापरायचं? वाचा स्टेप बाय स्टेप

हलवा बनवण्याची सोपी पद्धत

हलवा बनवताना गाजर किसणे हे खूप मेहनतीचे काम असते. त्यामुळे तुम्ही गाजराचे बारीक बारीक काप करुन ते कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने गाजर बारीक करु शकता. या पद्धतीने गाजराचा हलवा केल्यानेदेखील चविष्ट लागतो.

Gajar Halwa
Relationship Tips : तुमचा पार्टनर तुमच्याशी खरं बोलतोय का? कसे कराल 'दूध का दूध और पानी का पानी'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com