Pani Puri and Cancer  Saam tv
लाईफस्टाईल

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

Pani Puri side effect : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग, असा अहवाल भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सादर केलाय. यावर वैद्यकीय तज्ज्ञानी मत मांडलं आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : शहराच्या कोणत्याही नाका, चौकाला गेला तर तुम्हाला पाणीपुरी विक्रेता दिसतोच. लहानांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत पाणीपुरीचे चाहते आहेत. काही जणांना पाणीपुरीचं नाव काढलं तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या याच पाणीपुरीबद्दल धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने कर्नाटकात रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या २६० पाणीपुरीच्या स्टॉलवरून नमुने गोळा केले होते. नमुन्याच्या तपासणीनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'डेक्कन हेराल्ड' च्या वृत्तानुसार, रस्त्यावरून गोळ्या केलेल्या एकूण ४१ स्टॉल्सवरील पाणीपुरीत आर्टिफिशिअल रंगाचा वापर करण्यात आला होता. या आर्टिफिशिअल रंगामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. तर एकूण १८ स्टॉलवरील पाणीपुरींची गुणवत्ता खराब होती. या स्टॉलवरील पाणीपुरी खाणे आरोग्यासाठी हानीकारक होती. त्या स्टॉलवरील पाणीपुरी खाल्ल्याने अन्नातून विषबाधा देखील होऊ शकते. तसेच २२ स्टॉलवरील पाणीपुरी FSSAIच्या दृष्टीने गुणवत्ताहीन ठरल्या. या पाणीपुरीमध्ये ब्रिलियंट ब्लू, सनसेट यलो, टार्ट्राजिन सारखे केमिकल्स आढळले. या केमिकल्समुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं.

पाणीपुरीवर वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या अहवालावर डॉ. कल्याण गंगवाल यांनी म्हटलं की, पाणीपुरीमध्ये कलरिंग एजंट म्हणून केमिकल वापरले जातात. पदार्थाला, पाणीपुरीच्या पाण्याला रंग यावा म्हणून हे केमिकल वापरले जातात. मात्र याला चव नसल्याने खाणाऱ्याला कळत नाही. हे कलरिंग एजंट कार्सोजेनिक म्हणजेच कॅन्सरकारक असतात. पाणीपुरी विक्रेत्यांमध्ये जागृती करणे हा यावरील सर्वात महत्वाचा उपाय आहे'.

'पाणीपुरी विक्रेत्यांना देखील माहिती नसते की, ते कोणते केमिकल वापरत आहेत. त्यामुळे काय दुष्परीणाम होऊ शकतात. पाच वर्षापूर्वीच मी याबाबत राज्य सरकारला पत्र लिहिले होते. फक्त पाणीपुरीच नाही तर, हॅाटेलमधील पदार्थ, मिठाई यामध्ये देखील हे कार्सोजनिक कलरिंग एजंट वापरले जातात. त्याबाबतही जनजागृती करायला हवी. कलरींग एजंटबरोबरच, पदार्थांना चव येण्यासाठी अजिनोमोटो वापरले जाते. ते देखील आरोग्यास धोकादायक आहे. त्यामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो. भारतात ह्रुदयविकार आणि कॅन्सरचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे आपण जास्त काळजी घेण्याची गरज आहे, असेही डॉ. गंगवाल यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

SCROLL FOR NEXT