Fungal Infection : पावसाळ्यात तुम्हालाही होऊ शकतं Fungal Infection; अशी घ्या स्वत:ची काळजी

Fungal Infection During Monsoon : काही व्यक्तींच्या त्वचेला फंगल इंफेक्शन, खाज येणे, जळजळणे अशा समस्या जाणवतात. त्यामुळे पावसात फंगल इंफेक्शन होऊ नये म्हणून काय करावे?
Fungal Infection During Monsoon
Fungal InfectionSaam TV

पावळा सुरू झाला असून प्रत्येक व्यक्तीला तळपत्या उन्हापासून थोडा दिसाला मिळाला आहे. पावसाळा जसा तुम्हाला आवडतो, तसाच तो बॅक्टेरीया आणि लहान विषाणूंचा सुद्धा आवडीचा ऋतू आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण पावसात बॅक्टेरीया, लहान कीटक फार झपाट्याने वाढतात. हे वातावरण त्यांच्यासाठी पोषक असतं. त्यामुळे काही व्यक्तींच्या त्वचेला फंगल इंफेक्शन, खाज येणे, जळजळणे अशा समस्या जाणवतात. त्यामुळे पावसात फंगल इंफेक्शन होऊ नये म्हणून काय करावे? तसेच याची काळजी कशी घ्यावी याची महिती सांगणार आहोत.

सैल कपडे परिधान करा

पावसाळ्यात वातावरणात मॉश्चराइज पसरलेलं असतं. त्यामुळे बाहेर गारवा असला तरी काही कामं केली, धावलो किंवा चाललो तरी आपल्याला घाम येतो. शिवाय पावसाचं पाणी सुद्धा काहीवेळा आपल्यावर पडतं. तर हे पाणी लगेचच सुकत नाही, त्यामुळे सैल कपडे परिधान करा. सैल कपडे लगेचच सुकतात तसेच त्याने आपल्याला फंगल इंफेक्शन सुद्धा होत नाही.

घाम आल्यास लगेचच पुसून घ्या

काही व्यक्तींच्या शरीरात जास्तप्रमाणात हिट असते. त्यामुळे त्यांना जास्त प्रमाणात घाम येतो. काही व्यक्तींना अंडआर्म्स आणि गुडघ्यांना पाठीमागच्या बाजूने सुद्धा घाम येतो. अशावेळी घात सतत पुसणे गरजेचं असतं. प्रवासात आपली कपडे त्या अंडआर्म्समध्ये जास्त ओली होतात. त्यामुळे असे कपडे लगेचच बदलावे. ते अंगावरच सुकून देऊ नये.

हाथ स्वच्छ करा

जेव्हा जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा हातावर बॅक्टेरिआ असतात. त्यामुळे सर्वात आधी फ्रेश व्हा. हात पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आपल्या हातांनी आपण शरीरातील प्रत्येक अवयवाला स्पर्श करतो. तसेच विविध वस्तूंनाही आणि प्राण्यांना सुद्धा स्पर्श करतो. अशावेळी हात अस्वच्छ होतात. तुम्ही तसाच हात शरीराला लावला तर फंगल होण्याची आणि जास्त वाढण्याची शक्यता असते.

टॉवेल प्रत्येक दिवशी चेंज करा

आपण टॉवेलने हात, पाय, तोंड आणि संपूर्ण शरीर साफ करतो. अंघोळीनंतर आपला टॉवेल पाण्याने ओला होतो. काही महिला केस धुतल्यावर त्यांना देखील टॉवेल बांधून ठेवतात. नंतर असे टॉवेल उन्हात किंवा हवेला सुकत ठेवतात. सुकल्यावर पुन्हा दुसर्‍या दिवशी तोच टॉवेल वापरतात असे करणाऱ्या व्यक्तींना जास्तप्रमाणात फंगल होण्याची शक्यता असते.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com