Moong Dal Bhaji Saam TV
लाईफस्टाईल

Moong Dal Bhaji Recipe: मुसळधार पावसात गरमागरम मुग डाळीच्या भजीचा अस्वद घ्या; वाचा रेसिपी

Moong Dal Pakoda Recipe in Marathi: भजी छान फुलावेत यासाठी त्यामध्ये थोडा सोडा टाका. त्यानंतर गरम तेलात भजी तळून घ्या. असे गरम भजी प्रत्येकाला खावे वाटतात.

Ruchika Jadhav

बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला की सर्वांना गरम गरम भजी खावीशी वाटतात. आता रोज नवीन नवीन कोणती भजी बनवावी याचा मोठा प्रश्न अनेकांना पडतो. तर आज आम्ही तुमच्यासाठी मुगाच्या डाळीचे भजी कसे बनवतात याची रेसिपी आणली आहे.

साहित्य

मुगाची डाळ

पाणी

हिरवी मिरची

कांदा

अद्रक

कोथिंबीर

मीठ

तेल

बेसन पीठ

कृती

मुगाच्या डाळीचे भजी बनवणे फार सोपे आहे. त्यासाठी आधी अर्धा तास तरी मुगाची डाळ भिजत ठेवा.

डाळ भिजवायला विसरले असाल आणि ऐनवेळी तुम्हाला भजी खावीशी वाटत असतील तर सुरुवातीला डाळ ओबाडधोबड राहील अशी मिक्सरला फिरवून घ्या. त्यानंतर ती कोमट पाण्यात टाकून ठेवा.

पुढे कांदा चिरून घ्या. भजी बनवताना कांदा नेहमी अगदी बारीक चिरून घ्यावा. त्यानंतर थोडं आलं, मिरची आणि कोथिंबीर मीठ टाकून मिक्सरला बारीक करून घ्या.

पुढे एका भांड्यात बेसन पीठ काढून घ्या. या पिठात थोडं जिरे मिस्करला बारीक केलेलं मिश्रण देखील मिक्स करा. त्यानंतर यात चवीनुसार मीठ आणि बारीक केलेली डाळ मिस्क करा.

भजी छान फुलावेत यासाठी त्यामध्ये थोडा सोडा टाका. त्यानंतर गरम तेलात भजी तळून घ्या. असे गरम भजी प्रत्येकाला खावे वाटतात.

तुम्ही हे भजी सॉस किंवा मिरची आणि चहा बरोबर देखील खाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, आता १४ आमदार फुटणार? शिंदेंच्या आमदाराच्या दाव्याने खळबळ

Black Rain : 'काळा पाऊस' कोसळला; नागरिक हबकले, मॉस्कोमधील व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

PhonePe Alert: PhonePe युजर्सला झटका! व्यवहार न करताही पैसे कापले जाणार, नवा नियम काय?

Sangli Crime News: कॅफेत बोलावलं अन्...; सांगलीत अल्पवयीन तरुणीसोबत घडलं क्रूर कृत्य

सर्वात स्वस्त साड्या कुठे मिळतात? महिलांना माहितीये का 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT