Priya More
बेसन चेहऱ्याच्या त्वचेसाठी खूपच फायदेशीर असते. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
बेसन चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा निरोगी होते आणि चेहऱ्यावर पूरळ येण्याची समस्या दूर होते.
पण अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही बेसनमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावू नका.
अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड किंवा बीटा हायड्रॉक्सी अॅसिडसारखे रासायनिक एक्सफोलिअंट बेसनमध्ये घालू नका.
स्क्रबमध्ये खडबडीत कण आणि मोठे दाणे असतात. ते बेसनमध्ये टाकून चुकूनही चेहऱ्यावर लावू नका.
अल्कोहोलयुक्त प्रोडक्ट चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेवर असलेले नैसर्गिक तेल निघून जाते. त्यामुळे ते बेसनामध्ये मिक्स करू नका.
बेसन नैसर्गिक असले तरी देखील ते त्वचेतून पूर्णपणे काढून टाकणे गरजेचे असते.
सदर लेक फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.