Priya More
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा. यंदा गुढी पाडवा ९ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे.
गुढी पाडव्याला हिंदू नववर्षाचा पहिला सण म्हटले जाते. या दिवशी महाराष्ट्रात गुढी उभारली जाते.
गुढी पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पानं आणि गूळ खाण्याची परंपरा आहे.
गुढी पाडव्याला कडुलिंबाची पाने, फुले, चण्याची भिजवलेली डावळ, जिरे, हिंग आणि मध मिक्स करून प्रसाद तयार केला जातो.
कडूलिंब शक्तिवर्धक असते. कडूलिंबाची पाने खाल्लाने शरीराला ऊर्जा मिळते.
कडूलिंबामध्ये अँटी-बक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
कडूलिंबामुळे आपण निरोगी राहतो. डायबिटीजचा धोका टळतो. त्याचसोबत पोटातील जंत देखील दूर होतात.
कडूलिंबाचा रस प्यायल्यामुळे शरीरातील चरबी कमी होते. कडूलिंबाची पानं पाण्यात टाकून आंघोळ केल्यामुळे शरीराला खाज येत नाही.
गूळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे अॅसिडीटीची समस्या देखील दूर होते.
गूळ खाल्ल्याने श्वसनाशी संबंधित आजारांशी लढण्यास मदत होते. त्याचसोबत त्वचेशी संबंधित समस्या देखील दूर होतात.
गूळ दुधामध्ये मिक्स करून प्यायल्यामुळे पोट स्वच्छ होते. कारण त्यामध्ये फायबर असते.