Priya More
मखाने आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. यामध्ये अँटी ऑक्साइड गुणधर्म असतात.
मखाने खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रोगांशी लढण्याची क्षमता मिळते.
मखाने जास्त खाणे शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. त्यामुळे मखाने प्रमाणात खावे.
मार्केटमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या फ्लेवर्सवाले मखाने खायला अनेकांना आवडते. त्यामुळे ते प्रमाणाबाहेर खाल्ले जाते.
मखान्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे नुकसान होऊ शकते.
मखाने जास्त खाल्ल्यामुळे तहान खूप लागते. त्याचसोबत यामुळे शरीरातील निर्जलीकरण सुरू होते.
मखान्याचे मर्यादीत प्रमाणात सेवन केल्यावरच चांगले फायदे होतात.
मखाने भाजून खाण्यापेक्षा त्याची खीर बनवून खा. त्यामुळे जास्त फायदा होतो.
मखान्यासोबत तुम्ही नारळ पाणी देखील पिऊ शकता. यामुळे जास्त वेळ शरीर हायड्रेट राहते.