Manasvi Choudhary
पावसाला सुरूवात झाली की गरमा गरम भजीचा बेत आखला जातो.
पावसाळ्यात कुठेही फिरायला गेल्यावर किंवा ऑफिसमध्ये गरमा गरम भजीचा आस्वाद घेतला जातो.
हिरव्यागार वातावरणात या विविध प्रकारच्या भजींची चव चाखल्याने आरोग्यही सुरळीत राहते.
चटपटीत हिरवी मिरची घालुन केलेली पालक भजी शरीरासाठी फायदेशीर आहेत.
कमी वेळेत झटपट बनणारी कांदा भजी खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
बारीक डाळ वाटून त्यात लाल तिखट, मीठ, मसाला टाकून केलेली मुगाच्या डाळीची भजी पचायला अगदी सोपी असतात.
बारीक चिरलेली हिरवी मेथी बेसन पीठात घालून गरमागरम भजी खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते.