Kargil Vijay Diwas 2024  Saam TV
लाईफस्टाईल

Kargil Vijay Diwas 2024 : कारगिल युद्ध किती दिवस चालले? प्रत्येक भारतीयाला या 5 प्रश्नांची उत्तरे माहीत असलीच पाहिजेत

Information About Kargil War : शत्रूशी दोन हात करत असताना अनेक भारतीय जवानांना वीर मरण देखील आलं. आज २६ जुलै रोजीच हे युद्ध झालं होतं. या युद्धांबद्दल प्रत्येक भारतीय व्यक्तीला पुढील गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.

Ruchika Jadhav

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर यांमध्ये आजवर तीन युद्धे झाली आहेत. पहिलं युद्ध १९६५ रोजी, दुसरं युद्ध १९७१ आणि १९९९ मध्ये कारगिल युद्ध झालं. भारतामधील हे सर्वात मोठं युद्ध मानलं जातं. भारताने पाकिस्तानला या तिनही युद्धांमध्ये धूळ चाखवली आहे.

प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी येथील विजय अभिमानास्पद आहे. मात्र हा विजय मिळवताना शत्रूशी दोन हात करत असताना अनेक भारतीय जवानांना वीर मरण देखील आलं. आज २६ जुलै रोजीच हे युद्ध झालं होतं. या युद्धांबद्दल प्रत्येक भारतीय व्यक्तीला पुढील गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.

कारगिल युद्धात कोड नेम काय होतं?

कारगिल युद्धामध्ये भारतीय सेनेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला ऑपरेशन विजय असं नाव देठण्यात आलं होतं. कारगिल युद्ध सुरू असताना टोलोलिंग टॉप आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय सौन्य तीन विभागांत विभगलं गेलं होतं. या तीन टिम्सना अभिमन्यू, भीम आणि अर्जुन अशी नावे देण्यात आली होती.

कारगिल युद्धाचं जुनं नाव काय?

कारगिल हा जिल्हा लडाख अंतर्गत येतो. जेव्हा कारगिल युद्ध झालं तेव्हा कारगिल जिल्हा जम्मू-काश्मीर अंतर्गत येत होता. त्यामुळे त्यावेळी हा जिल्हा पुरीग या नावाने सुद्धा ओळखला जात होता. अनेक व्यक्तींना अद्यापही याबाबत माहिती नाही.

२६ जुलैला हा दिवस का साजरा करतात?

कारगिल दिवस २६ जुलैला साजरा केला जातो कारण याच दिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीतील टायगर हिल, पॉईंट 4875, पॉइंट 5140 आणि सर्व डोंगर तसेच शिखरांचा भाव जिंकला होता. याच दिवशीला पाकिस्तानवर मात करत भारताने विजय मिळवला होता. त्यामुळे २६ जुलैला दरवर्षी कारगिल दिवस साजरा केला जातो.

कारगिल युद्ध सुरू असताना भारताचे पंतप्रधान कोण होते?

कारगिल युद्ध सुरू होते त्यावेळी भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. युद्ध जिंकल्यानंतर त्यांनीच या विजयाची घोषणा केली होती. तसेच या काळात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT