Kargil Vijay Diwas : 'कारगिल विजयगाथा...', ५ शूरवीरांचं शौर्य पाहून पाकिस्तानही हादरलं होतं

Kargil War Memorial : कारगील विजयाचा भारत देशाला अभिमान आहे. या युद्धामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या ५ सैनिकांबद्दल जाणून घेऊया.
Kargil Vijay Diwas
Kargil Vijay DiwasSaam Tv

Kargil War Heroes : आज आपण २४ वा 'कारगिल विजय दिवस'(Kargil Vijay Diwas)साजरा करत आहोत. आज त्या जवानांचा दिवस आहे ज्यांनी भारतासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारतात २६ जुलै हा दिवस कारगील विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

कारगिलची गाथा

३ मे १९९९ ते २६ जुलै १९९९मध्ये कारगिलचे युद्ध सुरू होते. पाकिस्तान विरोधी या युद्धात भारतीय जवानांनी विजय मिळवला. जम्मू काश्मिरमधील कारगिलमध्ये झालेल्या या युद्धात ५२७ जवानांनी प्राण गमावले. तर १३६३ जवान हे जखमी झाले होते. या युद्धासाठी भारतीय जवानांनी आपल्या रक्ताचे पाणी केले. त्यांच्या या शौर्याचा भारत देशाला अभिमान आहे. या युद्धामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या ५ सैनिकांबद्दल जाणून घेऊया.

Kargil Vijay Diwas
Kargil Vijay Diwas Story: पाकिस्तानला धुळ चारत भारताने 'कारगिल' जिंकलं, चित्तथरारक कहाणी आजही आणते डोळ्यात पाणी...

कॅप्टन विक्रम बत्रा

कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जन्म ९ सप्टेंबर १९७४ रोजी हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे झाला. ते 13 J&K रायफल्समध्ये कॅप्टन होते. ६ डिसेंबर १९९७ रोजी, इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनमधून उत्तीर्ण झाल्यानंतर, विक्रम लेफ्टनंट म्हणून सैन्यात सामील झाले. कारगिल युद्धादरम्यान त्यांची बटालियन जम्मू आणि काश्मीर रायफल्स द्रास येथे पोहोचली.

१९ जून रोजी कॅप्टन विक्रम बत्रा यांना पॉइंट 5140 परत घेण्याचा आदेश देण्यात आले होते. उंचीवरुन होत असलेल्या शत्रूंच्या हल्ल्यांना न जुमानता त्यांनी आपली पोझिशन काबीज केली. 17,000 फूट उंचीवर पॉइंट 4875 काबीज करणे हे त्यांचे ध्येय होते. पाकिस्तानी सैन्य हे 16,000 फूट उंचीवर होते. ते बर्फाच्छादित खडकात 80 अंशांच्या कोनात तिरके होते.

Kargil Vijay Diwas
Chat GPT App Launch For Android: प्रतीक्षा संपली! चॅट जीपीटी भारतात लॉन्च; अँड्रॉइड फोनमध्ये असे कराल डाउनलोड

७ जुलैच्या रात्री ते आणि त्यांचे सैनिक शिखर चढू लागले. त्यांना 'शेरशाह' हे सांकेतिक नाव देण्यात आले होते. एका जवानाला मदत करण्यासाठी विक्रम बत्रा पुढे आल्यावर त्यांच्यावर गोळीबार झाला. पण त्यांनी त्याच्याशीही न घाबरता सामना केला.

शत्रू हमला करत असताना उलट त्यांनी ग्रेनेड फेकून पाच शत्रूंना ठार केले. पण दुर्देवी म्हणजे शत्रूची गोळी त्यांच्या छातीत लागली. त्यामुळे ते शहिद झाले. आजही त्यांना 'शेरशाह' नावाने ओळखले जाते.

विक्रम बत्रा यांच्या पराक्रमामुळे भारतीय सैन्यानं दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ४८७५ शिखरे जिंकली. त्यांना 'विक्रम बत्रा टॉप' असे नाव देण्यात आले. कॅप्टन विक्रम बत्रा यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.ते शहिद झाले तेव्हा त्यांचे वय फक्त २४ वर्ष होते.'ये दिल मांगे मोर' ही त्यांची ओळही प्रसिद्ध आहे. विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर २०२१ मध्ये चित्रपटही बनवण्यात आला आहे. त्याचे नाव 'शेरशाह' असे आहे.

Kargil Vijay Diwas
Gold Silver Price : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीचे भावही वधारले; जाणून घ्या मुंबईतील आजचे दर

कॅप्टन अनुज नायर

कॅप्टन अनूज नायर यांचा जन्म २८ ऑगस्ट १९७५ रोजी दिल्लीत झाला. ते जाट रेजिमेंटमध्ये कॅप्टन होते. भारतीय मिलिटरी अकॅडमीतून उत्तीर्ण झाल्यानंतर जून 1997 मध्ये जाट रेजिमेंटच्या १७ व्या बटालियनमध्ये सामिल झाले. कारगिल युद्धादरम्यान त्यांचे पहिले ऑपरेशन पॉइंट ८७५ काबीज करण्याचे होते. हे शिखर टायगर हिलच्या पश्चिमेला होते.ते ताब्यात घेणे हे भारतीय लष्कराचे लक्ष होते.

मोहिमेच्या सुरुवातीलाच नायरचा कंपनी कमांडर जखमी झाला होता. हल्ला करणाऱ्या पथकाची दोन भागात विभागणी करण्यात आली होती. एकाचे नेतृत्व कॅप्टन विक्रम बत्रा आणि दुसऱ्याचे नेतृत्व कॅप्टन अनुज करत होते. कॅप्टन अनुजच्या टीममध्ये सात सैनिक होते, ज्यांच्या मदतीने त्यांनी शत्रूवर चौफेर हल्ला केला.

Kargil Vijay Diwas
Perfect Rice Cooking Hacks : महागातला तांदूळ घेतला तरीही भात चिकटच होतो? मोकळा- सुटसुटीत भात बनवण्यासाठी सोप्या टिप्स फॉलो करा

कॅप्टन अनुज यांनी एकट्याने 9 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आणि शत्रूचे तीन बंकर नष्ट केले. चौथ्या बंकरवर हल्ला करताना शत्रूने त्यांच्या दिशेने रॉकेट प्रोपल्ड ग्रेनेड फेकले जे थेट त्यांच्यावर पडले. गंभीर जखमी होऊनही त्यांनी उरलेल्या सैनिकांचे नेतृत्व केले. 7 जून रोजी ते शहीद झाले. पण शहीद होण्यापूर्वी त्यांनी शेवटचे बंकरही उध्वस्त केले.

दोन दिवसांनी पुन्हा शत्रूंनी शिखरावर हल्ला केला. तेव्हा विक्रम बत्रा यांच्या टीमने त्यांना प्रत्युत्तर दिले.कॅप्टन नायर यांना महावीर चक्र प्रदान करण्यात आले. ते शहिद झाले तेव्हा त्यांचे वय १४ वर्ष होते.

Kargil Vijay Diwas
Monsoon Diarrhea Problem In Kids: पावसाळ्यात मुलांचे पोट बिघडले? तर डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश लगेच करा

कॅप्टन मनोज कुमार पांडे

कॅप्टन मनोज कुमार पांडे यांचा जन्म 25 जून 1975 रोजी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे झाला. ते 11 गोरखा रायफल्सच्या 1ल्या बटालियनमध्ये (1/11 Gr) कॅप्टन होते. कारगिल युद्धादरम्यान ११ जून १९९९ रोजी त्यांनी बटालिक सेक्टरमधून शत्रूच्या सैनिकांना हुसकावून लावले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी जुबार टॉप ताब्यात घेतला.

तिथे शत्रूच्या गोळीबारातही त्यांनी झूंज दिली. खाद्यांवर आणि पायाला गोळी लागली असूनही ते शत्रूच्या पहिल्या बंकरमध्ये घुसले. या लढाईत दोन शत्रूंना ठार मारले आणि पहिला बंकर उद्ध्वस्त केला.त्यांनी स्वतः च्या जखमा लक्षात न घेता त्यांनी एका बंकरवरून दुसऱ्या बंकरवर हल्ले केले. त्यांच्या सहकारी सैनिकांनीही त्यांची पूर्ण साथ दिली.

२२ दिवस त्यांनी शत्रूंना नमवले. पण शेवटचा बंकर पकडला तोपर्यंत ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे ३ जुलै १९९९ रोजी ते शहीद झाले. असे म्हणतात की कॅप्टन मनोजचे शेवटचे शब्द होते - 'ना छोडनु' (नेपाळी भाषेत 'त्याला सोडू नका').

Kargil Vijay Diwas
Income Tax Return : टॅक्स भरण्यासाठी काहीच दिवस शिल्लक! ITR-1 चा फॉर्म भरण्याचा अधिकार कुणाला? जाणून घ्या सविस्तर

कॅप्टन मनोज यांचे हौतात्म्य व्यर्थ गेले नाही. त्यांच्यामुळे भारतीय सैनिकांनी खालुबरला ताब्यात घेतले. त्यांच्या या धैर्यासाठी त्यांना परमवीर चक्र,सैन्याचे सर्वौच्च पदक देण्यात आले. त्यांना 'बटालिकचा नायक' असेही म्हटले जाते. ते शहिद झाले तेव्हा त्यांचे वय २४ वर्ष होते.

मेजर राजेश सिंह अधिकारी

मेजर राजेश सिंह अधिकारी यांचा जन्म 25 डिसेंबर 1970 रोजी नैनिताल, उत्तराखंड येथे झाला. ते 18 ग्रेनेडियर्स युटिनमध्ये मेजर होता. इंडियन मिलिटरी अकॅडमीतून देहराडूनमधून पास झाल्यानंतर ११ डिसेंबर १९९३ रोजी ते सैन्यात दाखल जाले. कारगिल युद्धादरम्यान, मैकेनाइज्ड इन्फैंट्री दळातील मेजर राजेश सिंह अधिकारी यांच्याकडे तोलोलिंगमधून पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Kargil Vijay Diwas
Tata Motors Scrapping Centre: टाटा मोटर्सचं पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचं पाऊल, भुवनेश्वरमध्ये उभारतेय केंद्र

१४ मे १९९९ रोजी मेजर राजेश अधिकारी यांनी प्रत्येकी 10 सदस्यांची तीन टीम तयार केली. घुसखोरांना पाकिस्तानातून हाकलून देण्याची योजना आखली. ते त्याच्या कंपनीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नेतृत्व करत होते.युनिव्हर्सल मशीन गनच्या साहाय्याने त्यांनी शत्रूला त्यांच्या स्थानावरुन कमकुवत केले.

त्यांनी ताबडतोब रॉकेट लॉंचर तुकडीला शत्रूच्या स्थितीत व्यस्त राहण्याचे निर्देश दिले. त्यांनी वाट न पाहता पोझिशनमध्ये घुसले.त्या लढाईत दोन शत्रूंना आपले प्राण गमवावे लागले.

या लढाईदरम्यान, अधिकारी यांना बंदुकीची गोळी लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. तरीही त्यांना त्यांच्या सबयुनिटला काम चालू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यांनी शत्रूची दुसरी जागा ताब्यात घेतली आणि त्यांना मागे टाकले.

Kargil Vijay Diwas
ITR Verification : आधारकार्डच्या मदतीने घरबसल्या करा इनकम टॅक्स रिटर्नचे ई-व्हेरिफिकेशन; या सोप्या स्टेप्स करा फॉलो

भारताने पॉइंट 4590 काबीज केला. टोटोलिंगमध्येही दुसरे स्थान पटकावले. मात्र, यादरम्यान ३० मे १९९९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना महावीर चक्र,रणांगणावरील शौर्यासाठी दुसरा सर्वोच्च भारतीय लष्करी सन्मान प्रदान करण्यात आले. ते शहिद झाले तेव्हा त्यांचे वय १२८ वर्ष होते.

स्क्वाड्रन लीडर अजय आहुजा

स्क्वाड्रन लीडर अजय आहुजाचा जन्म २२ मे १९६८ रोजी कोटा, राजस्थान येथे झाला. ते गोल्डन एरोज, स्क्वाड्रन क्रमांक 17 युनिटमध्ये अधिकारी होते.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला येथून उत्तीर्ण झाल्यानंतर १४ जून १९८५ रोजी फायटर पायलट म्हणून भारतीय हवाई दलात सामील झाले.

कारगिल युद्धादरम्यान, नियंत्रण रेषेच्या या बाजूच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 'ऑपरेशन सफेद सागर' सुरू करण्यात आले. फ्लाइट लेफ्टनंट नचिकेता यांच्या मिग-२७एल विमानाच्या इंजिनला आग लागल्याने उडी मारली.

Kargil Vijay Diwas
Inverter Battery : इन्व्हर्टरचे पाणी महिन्यातून किती वेळी बदलावे? यापद्धतीने वापरल्यास होऊ शकते नुकसान, जाणून घ्या सविस्तर

स्क्वॉड्रन लीडर आहुजा आपल्या मिग-२१ एमएफ विमानातून शत्रूच्या स्थानांवरून नचिकेताच्या स्थानाची माहिती रेस्क्यू टीमला देत राहिले. शत्रू आपल्यावर केव्हाही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे वापरु शकतो हे त्यांना चांगलेच माहीत होते. आणि तसंच झालं. काही वेळातच त्यांच्या विमानाला MIM-92 स्ट्रिंगरने धडक दिली. त्यांनी विमानातून उडी मारली.

त्यामुळे हवाई दलाला एक नव्हे तर दोन बचाव मोहिमा राबवायच्या होत्या. मात्र हवाई दलाला त्याच्या ठिकाणाची माहिती मिळाली नव्हती. ७ मे १९९९ रोजी पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना कैद केले आणि त्यांची निर्घृण हत्या केली. त्यांच्या मृतदेहावर अनेक गंभीर जखमांच्या खुणा दिसत होत्या. त्यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले. ते शहीद झाले तेव्हा ते अवघ्या ३६ वर्षांचे होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com