Perfect Rice Cooking Hacks : महागातला तांदूळ घेतला तरीही भात चिकटच होतो? मोकळा- सुटसुटीत भात बनवण्यासाठी सोप्या टिप्स फॉलो करा

How To Making Perfect Rice: तांदळाचे प्रकारे अनेक असले तरी कितीही चांगल्या प्रतीचा तांदूळ घेतला तरी भात चिकट होतो.
Perfect Rice Cooking Hacks
Perfect Rice Cooking HacksSaam Tv

How to Cook Perfectly Fluffy Rice Every Time : वरण भात हा ताटातील एक आहारच. गरमा गरम वरण भात व त्यावर साजूक असे तूप पदार्थाची चव वाढवतात. वरण भात म्हटलं की, कोणत्याही वेळी खाता येणारा पदार्थ. वरण भात करायला जितका सोपा तितकाच काहीसा अवघड पदार्थ.

भातावरुन गृहिणीला स्वयंपाक करता येतो की नाही हे कळते. तांदळाचे प्रकारे अनेक असले तरी कितीही चांगल्या प्रतीचा तांदूळ घेतला तरी भात चिकट होतो. असा भात वरण-आमटीसोबत खाण्यासही कंटाळा येतो. बरेचदा आपण भात बनवण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या ट्रिक्स वापरतो. पण तरीही देखील तो चिकट किंवा मोकळा होत नाही. भात मोकळा होण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

Perfect Rice Cooking Hacks
Is Rice Good For Health : दररोज भात खाणे शरीरासाठी चांगले आहे का?

1. योग्य तांदूळ (Rice) निवडा

पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम (Rules) जो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे तो म्हणजे योग्य तांदूळ निवडणे. म्हणजे भात जर लहान असेल तर तो चिकट होतो. त्यामुळे तो शिजवताना तो चिकटून राहातो. त्यामुळे योग्य प्रतीचा तांदूळ निवडणे गरजेचे आहे. बासमती तांदूळ चिकट नसतो. पांढऱ्या किंवा लहान आकाराच्या स्टार्चचे प्रमाणा जास्त असते तर बासमती तांदळात स्टार्चचे प्रमाण खूपच कमी असते.

2. भात तयार करण्यासाठी पाण्याचे प्रमाण

भात तयार करताना किती प्रमाणात पाणी घालायचे हा सर्वात मोठा पेच असतो. त्यासाठी 1 कप तांदळासाठी 1.5 कप पाणी पुरेसे आहे हे नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनमध्ये भात बनवत असाल तर पाण्याचे प्रमाण 2 कप असेल. यासोबतच तुम्ही तांदूळ किती वेळ भिजत ठेवत आहात हे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे भात शिजण्याचा वेळ कमी होतो आणि पाणीही कमी लागते. जर तुम्ही आधी तांदूळ भिजवले असतील तर अर्धा कप पाण्याचे प्रमाण कमी करा.

Perfect Rice Cooking Hacks
Thane Picnic Spots: पिकनिक स्पॉट शोधताय? ते ही ठाण्यात; ही १० पर्यटनस्थळे आहेत उत्तम पर्याय...

3. भात चांगला फुगण्यासाठी काय कराल ?

जर तुम्ही भांड्यात भात बनवत असाल तर 1 कप तांदळात 2 कप पाणी घाला आणि उकळी येईपर्यंत शिजवा. यानंतर भात मंद आचेवर २-३ मिनिटे ठेवा. तांदूळ ९० टक्के शिजल्यावर गॅस बंद करा आणि २ मिनिटे झाकून ठेवा. यानंतर पाणी गाळून घ्या आणि त्याच भांड्यात भात झाकून ठेवा. अशा प्रकारे भातही व्यवस्थित शिजला जाईल आणि पौष्टिक राहील.

4. रिफाइंड तेल आणि लिंबू घालून शिजवलेला भात बनवा

भात बनवण्यासाठी भांड्यात पाणी घालून गरम करा. त्यात तांदूळ घालून २ ते ३ मिनिटांनंतर १ चमचा रिफाइंड तेल व १ चमचा लिंबाचा (Lemon) रस मिक्स करा. थोडं झाकण ठेवून ३-४ मिनिटे शिजवा. यानंतर, भात शिजला आहे की नाही ते तपासा.

Perfect Rice Cooking Hacks
Potato Idli Recipe: तांदूळ-रवाच नाही तर बटाट्यापासून बनवा लुसलुशीत इडली; तोंडात टाकताच विरघळेल, पाहा रेसिपी

5. प्रेशर कुकरमध्ये पफ केलेला भात कसा बनवायचा?

जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये भात शिजवत असाल तर यासाठी प्रथम प्रेशर कुकरला तुपाने चांगले ग्रीस करा. त्यानंतर त्यात तांदूळ आणि पाणी घालून ३ शिट्ट्या होऊ द्यात. भात चांगल्याप्रकारे शिजेल व मोकळा देखील होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com